साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन
1 min read

साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे येथे
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे, तालुका अमळनेर येथे थोर समाज सेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली व वाचन पंधरवडा या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण लोकनियुक्त सरपंच सौ सरला ताई प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वाचनालयाचे अध्यक्ष डी.एम पाटील सर होते. कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य प्रकाश पाटील ( वकील बाबा),नवल पाटील गुढेकर, प्रकाश भाऊ वाल्हे, पीतांबर आप्पा, देविदास लोटन पाटील, भटू सोनू पाटील , जगलू पारधी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.एम पाटील सर यांनी सावित्री बाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली. तसेच किसान विद्यालय जानवे येथे जाऊन विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून सागितले. व जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी वाचनालयात येऊन पुस्तके वाचावीत असे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल विजय पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *