क्षेत्रीय फुलमाळी समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन
1 min read

क्षेत्रीय फुलमाळी समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

क्षेत्रीय फुलमाळी समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे समाज संस्थेच्या कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. माळी समाजाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर उपाध्यक्ष दिनेश बापू माळी यांनी माल्यार्पण केले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राच्या कार्याबद्दल चर्चा करण्यात आली ..सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांचे कार्य प्रत्येकांच्या घरी पोहोचले पाहिजे यासाठी शैक्षणिक सामाजिक उद्बोधन पर कार्यक्रम घेणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले..
यावेळी माळी समाज संस्थेचे
सचिव विजय माळी सहसचिव संजय खलाणे ,
प्रा.नगराज माळी,विजय हिरालाल महाजन
सह संचालक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव विजय माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन माळी समाज संस्थेचे संचालक प्रा नागराज माळी यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *