एम.एल.म्हात्रे महाविद्यालयात पोलीस स्थापना दिवस “रेझिंग डे” निमित्त कार्यशाळा संपन्न.*  *विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यापासून सावधान राहावे व वाहतुकीचे नियम पाळावेत: वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के.  *
1 min read

एम.एल.म्हात्रे महाविद्यालयात पोलीस स्थापना दिवस “रेझिंग डे” निमित्त कार्यशाळा संपन्न.* *विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यापासून सावधान राहावे व वाहतुकीचे नियम पाळावेत: वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के. *

Loading

*एम.एल.म्हात्रे महाविद्यालयात पोलीस स्थापना दिवस “रेझिंग डे” निमित्त कार्यशाळा संपन्न.*

*विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यापासून सावधान राहावे व वाहतुकीचे नियम पाळावेत: वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के.

*

ठाणे: कल्याण:( मनिलाल शिंपी) एम एल म्हात्रे महाविद्यालय आणि के.आर.माळदे इंग्लिश स्कूल रांजनोली, भिवंडी, जिल्हा ठाणे येथे आज, कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नेताराम म्हस्के साहेब, वाहतूक पोलीस निरीक्षक श्री रुपनेर साहेब, psi अशान साहेब, यांचा प्रमुख उपस्थितीत प्राचार्य श्री.गोरखनाथ तरे यांचा अध्यक्षतेखाली ” “पोलीस स्थापना दिवस” निमित्त मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नेताराम मस्के यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फ्रॉड, सायबर गुन्ह्यापासून सावधान व त्या बाबत तत्काळ पोलीस स्टेशनला कॉल केल्यास तातडीने मदत केली जाईल असे सांगितले व विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे कोणाचाही दबावाखाली न येता अशा प्रकारचे गुन्हे आढळून आल्यास त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क साधावा अशी आव्हान देखील वाहतूक शाखेचे पीएसआय रूपकर साहेब व अशान ू वाहतुकीचे नियम पाळून अपघाताला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे व वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन केले.यावेळी म्हात्रे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व आर एस पी चे ठाणे पालघर आणि नाशिक विभागाचे विभागीय समादेशक मनिलाल शिंपी यांनीही वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन केले, यावेळी डॉ.प्रा.कसबे सर, प्रा. दयानंद कांबळे, प्रा.माधव कांबळे, प्रा. शेटे सर, प्रा.जाधव सर, प्रा.विशाल सोनवणे, प्राचार्य सचिन ठाकरे, यांच्यासह महाविद्यालयाचे कार्यालयीन व्यवस्थापक श्री.रुपेश तरे यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *