समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी बरखास्त!  येत्या 10 जानेवारीला नवीन कार्यकारिणी जाहीर करणार-डॉ.सोन्या पाटील
1 min read

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी बरखास्त! येत्या 10 जानेवारीला नवीन कार्यकारिणी जाहीर करणार-डॉ.सोन्या पाटील

Loading

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी बरखास्त!

येत्या 10 जानेवारीला नवीन कार्यकारिणी जाहीर करणार-डॉ.सोन्या पाटील

ठाणे:भिवंडी ( मनिलाल शिंपी)समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, धर्म सेवक डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 22 वर्षापासून अखंडितपणे ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाज कल्याण न्यास च्या माध्यमातून अनेक उपक्रम साजरी केले जातात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यासह तालुक्यांची देखील नवीन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ.श्री.सोन्या काशिनाथ पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य बोलताना सांगितले आहे. आज जगातून माणुसकी हरवत चाललेली आहे प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे माणुसकी जपण्यातच खरं सुख आहे इतरांच्या आनंदातच आपला आनंद शोधणे तळागाळातील लोकांना मदत करणे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणे, आनंदाचे क्षण सर्वांन सोबत साजरी करणे, आपण आनंदी तर आहोतच पण आपल्यामुळे इतरही कसे आनंदी राहतील यासाठी समाज कल्याण
न्यास चे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील
सतत प्रयत्नशील असतात. म्हणून येत्या 10 जानेवारी 2025 रोजी समाज कल्याण न्यास या संस्थेचा 23 वा वर्धापन दिन सोहळा असल्याकारणाने संपूर्ण महाराष्ट्रात नवीन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे समाज कल्याण या संस्थेची महाराष्ट्र राज्यात जम्बो कार्यकारणी जाहीर होणार आहे सदर कार्यक्रम लवकरच शिर्डी येथे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *