*नवे वर्ष*
1 min read

*नवे वर्ष*

Loading

 

*नवे वर्ष*

हे काळाचे वळण नवे
वाटे मजला हवे हवे

नव्या भावना,नव्या कामना
नव्या कल्पना,नव्या योजना
आनंदाचे नवे थवे

देणे घेणे येणे जाणे
घडेल यातून जीवनगाणे
जुळत जातील सर्व दुवे

मनामनांच्या वाटांवरुनी
सुख दु:खांच्या लाटांवरुनी
करुणेने लावीन दिवे

भेदाभाव ना झाडापाशी
भेदभाव ना नदीच्यापाशी
सृष्टी चरणी मन हे लवे

अनुपमा जाधव
(ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार)
भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *