मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या: लोकशाहीच्या मूल्यांना धक्का!” 7 जानेवारीला आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन- उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद सुषमाताई वासुदेव देसले
![]()
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या: लोकशाहीच्या मूल्यांना धक्का!”
7 जानेवारीला आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन-
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद सुषमाताई वासुदेव देसले
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याने सर्वत्र धक्का बसला आहे. ही घटना संविधानिक पद्धतीसह लोकशाहीला काळिमा फासणारी ठरली आहे. ही हत्या कोणत्याही जाती किंवा धर्मासंबंधी नसून, एक पंचायत राज व्यवस्थेतील महत्त्वाच्या स्वरूपाचा अंत करणारी आहे.
या गंभीर घटनेचा निषेध करण्यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, आणि सदस्य बंधू भगिनींना 7 जानेवारी रोजी सकाळी आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, तसेच लोकनियुक्त सरपंच दहीवद आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद सुषमाताई वासुदेव देसले यांनी केले आहे.
या आंदोलनाद्वारे लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यात तसेच दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

