भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित…..
1 min read

भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित…..

Loading

भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित…..

==================
अवतीभोवती अशी अनेक माणसं आहेत,जी सतत आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करित असतात.काही माणसं मग यासाठी प्रस्थापित व्यवस्थेचा सहारा घेत असतात.तर काही माणसं स्वतःचा स्वाभिमान जपत लोकहिताची कामं कोणत्याही प्रसिध्दी पासुन चार हात लांब रहात कशाचीही अपेक्षा न बाळगता करत असतात.
बामसेफ,भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते समाजात जाऊन निरंतर काम करत असताना अशी माणसं गवसतात….म्हणुन अशा माणसांच्या बाबतीत एक शायर म्हणतो….
*🏵️”जमाना कर ना सका,उसके कद का अंदाजा……वो आसमा था,लेकिन सर झुकाके चलता था”*
==================
अशी काही गवसलेली माणसं…..त्यांना सन्मानित केलं….त्यांचं काळीज आभाळाएवढं झालं…..
*१)प्रा.डॉ.प्रकाश कांबळे*
जळगावातील एक प्रतिभावंत व आईचं काळीज असणारा लेखक व प्रस्थापित चमको व्यवस्थेपासुन चार हात लांब व पालख्यांच्या भोयांपास्नं मुद्दामहुन दुर्लक्षित केलेला एक मनस्वी माणुस….
*सत्यशोधक समाजाचे क्रांतीकारकत्व आणि वर्तमानातील वसा व वारसा….* या ग्रंथाचं प्रकाशन नुकतचं बामसेफच्या ४१ व्या राष्ट्रीय अधिवेशनात *मा.वामन मेश्राम साहेब* यांच्या शुभहस्ते झाले
त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार *मा.शशिकांत हिंगोणेकर साहेब* यांच्याहस्ते करण्यात आला.
*२)मा.आधार सपकाळे गुरुजी….३)मा.सुनिलभाऊ सोनवणे(M.R.)*
या दोन्ही मान्यवरांनी स्वतःचा संपुर्ण देह मरणोत्तर दान केला.यांनी हा संकल्प कोणताही गाजावाजा न करता हे निष्काम कर्म केले.
म्हणुन आधार गुरुजींचा सन्मान *मा.सलीम तडवी* सरांच्या शुभहस्ते तर मा.सुनिलभाऊंचा सन्मान साहित्यिक *मा.योगेश बागुल सर* यांच्या शुभहस्ते झाला.
*४)मा.विलासभाऊ सोनवणे* यांची नुकतीच ममुराबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली.अतिशय संघर्षातुन व त्यांच्या अंगी असलेल्या कर्तृत्वाने या पदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार *मा.भागवत सपकाळे सर* यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *