दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास उपहार: दक्षता महाजनच्या दुसरा वाढदिवस जल्लोषपूर्ण साजरा!
1 min read

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास उपहार: दक्षता महाजनच्या दुसरा वाढदिवस जल्लोषपूर्ण साजरा!

Loading

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास उपहार: दक्षता महाजनच्या दुसरा वाढदिवस जल्लोषपूर्ण साजरा!

अमळनेर प्रतिनिधी
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा येथे श्री. देविदास भिकन महाजन पारोळा यांची कन्या दक्षता महाजन तिचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या खास दिवशी, दक्षता महाजनने दिव्यांग विद्यार्थ्यांना पावभाजी, मिष्ठान्न, बिस्कीट, चिवडा, मोतीचूर लाडू यांसारखे स्वादिष्ट पदार्थ प्रदान करून आनंद दिला. याशिवाय, ५० टि-शर्ट्स वितरण करून विद्यार्थ्यांना विशेष भेट देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या आनंदात आणखी भर पडली.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर आणि शाळेचे मुख्याध्यापक मा. मनिष जाधव सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक हेमंत महाजन सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. एस. शेलकर सर यांनी केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या उपक्रमात सर्व विशेष शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अनमोल सहकार्य देखील केले, ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत संस्मरणीय बनला. दक्षता महाजनच्या वाढदिवसातील आनंद आणि एकत्रितता सर्वांनाच प्रेरणा देण्यास यशस्वी ठरली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *