साने गुरुजी विद्यालयातील कृष्णा जाधव व आयुष सोनवणे यांची एनसीसी कॅम्प साठी निवड*
1 min read

साने गुरुजी विद्यालयातील कृष्णा जाधव व आयुष सोनवणे यांची एनसीसी कॅम्प साठी निवड*

Loading

*साने गुरुजी विद्यालयातील कृष्णा जाधव व आयुष सोनवणे यांची एनसीसी कॅम्प साठी निवड*

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते तरी शैक्षणिक वर्ष 2024/25 यामध्ये इयत्ता नववी मध्ये शिकणारा कृष्णा विलास जाधव याची केरळ येथे एनसीसी ट्रेकिंग कॅम्प साठी निवड झाली सदर कॅम्प 21 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत केरळ मधील कोल्लम जिल्ह्यातील कुलथुपुझा येथे आयोजित केलेला आहे तर दुसरा विद्यार्थी आयुष दीपक सोनवणे याची EBSB (एक भारत श्रेष्ठ भारत) या कॅमसाठी कामठी येथे निवड झालेली आहे सदर कॅम्प हा 24 डिसेंबर ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत नागपूरमधील ओ टी ए कामठी येथे आयोजित केलेला आहे सदर विद्यार्थ्यांना 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे, ॲ डम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पिनाकी बनिक , एनसीसी ऑफिसचे लिपिक श्री सुनील सोनार व आमच्या साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे एनसीसी ऑफिसर श्री समाधान पाटील यांचे मार्गदर्शन लाभले सदर निवडी बाबत अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील, सचिव श्री संदीप घोरपडे , सर्व संचालक मंडळ व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील सर व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कृष्णा व आयुष चे कौतुक व अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *