संपादक, पत्रकार, सत्यशोधक डॉ. संभाजी खराट आदरांजली सभा*
![]()
*संपादक, पत्रकार, सत्यशोधक डॉ. संभाजी खराट आदरांजली सभा*
महाराष्ट्रातील सत्यशोधक विचारवंत व साहित्यिक, सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पत्रकार , सत्यशोधक डॉ. संभाजी खराट आदरांजली सभा दि 25/12/2024, बुधवार रोजी सकाळी 10.30 वाजता महात्मा गांधी भवन विभागीय शासकीय ग्रंथालयाच्या बाजुस,समर्थ नगर सावरकर चौक, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. डॉ. संभाजी खराट यांचे दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले. भारतात समतावादी सामाजिक क्रांती घडवून आणणाऱ्या फुले,शाहू, आंबेडकरी प्रबोधन चळवळीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने सत्यशोधक चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय पिछडा शोषित संघठन, सत्यशोधक शिक्षक सभा, सत्यशोधक विद्यार्थी संघटना तसेच इतर सर्व पुरोगामी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आदरांजली सभेचे आयोजन केले आहे. तरी आपण या अभिवादन सभेस आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. उमेश बगाडे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रा. सुदाम चिंचाणे, प्रभाकर गायकवाड, प्रा. प्रकाश सिरसाट, डॉ. कालिदास भांगे, सरस्वतीताई हारकळ, आदींनी केले आहे.

