शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जैन हिल्स कृषी महोत्सव अभ्यास दौरा संपन्न*  *लुपिन फाऊंडेशन तर्फे बेटर कॉटन प्रकल्पातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन*
1 min read

शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जैन हिल्स कृषी महोत्सव अभ्यास दौरा संपन्न* *लुपिन फाऊंडेशन तर्फे बेटर कॉटन प्रकल्पातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन*

Loading

*शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जैन हिल्स कृषी महोत्सव अभ्यास दौरा संपन्न*

*लुपिन फाऊंडेशन तर्फे बेटर कॉटन प्रकल्पातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन*

शिंदखेडा – दिनांक-21/12/2024 रोजी लुपिन फाऊंडेशन अंतर्गत बेटर कॉटन प्रकल्पातील शेतकरी यांचा जैन कृषी संशोधन केंद्र ,जळगाव आयोजित *भव्य कृषी महोत्सव* मध्ये शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग.
कृषी महोत्सवात फळबाग टिशू कल्चर,सोलर पॅनल, ठिबक सिंचन तंत्रज्ञान, केळी पीक अंतरपीक पद्धत, मसाला पीक लागवड तंत्रज्ञान, मधमाशी पालन, कापूस मलचींग पेपर लागवड पद्धत,रेन हार्वेस्टिंग,रेन गन,तुषार सिंचन शेती क्षेत्रातील पाश्चिमात्य देशातील सुधारित आधुनिक तंत्रज्ञान चे भव्य – दिव्य कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

 

त्यात विविध कृषी शास्त्रज्ञ यांनी प्रात्यक्षिक क्षेत्रावरती शेतकरी बांधवांना शास्त्रीय पद्धतीने माहिती समजावून सांगितली. या कृषी अभ्यास दौऱ्या मुळे कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान पाहून भारावून गेले.त्यांनी ही आपल्या शेतात नवीन तंत्रज्ञान स्वीकार करण्याचा संकल्प केला.यासाठी सदर कृषी अभ्यास दौरा साठी लुपिन फाऊंडेशन कडून शेतकऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती,सदर कृषी महोत्सव 14 डिसेंबर ते 14 जानेवारी पर्यंत सुरू राहील.तरी यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे, प्रकल्प समन्वयक चंदन टोक्षा, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील, पि. यु. व्यवस्थापक तुकाराम मासुळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कृषी मित्र राहूल माळी यांनी अभ्यास दौरा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *