राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाने सहयोग द्यावा- पारोळा येथील सभेत मुख्य संयोजक मा. भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन*
![]()
राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाने सहयोग द्यावा- पारोळा येथील सभेत मुख्य संयोजक मा. भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आपण सर्वजण साजरा करीत आहोत. संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली असून या संविधानाने भारतीय लोकशाही भक्कम केलेली आहे. तसेच जगामध्ये भारत आज एक सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य म्हणून गौरविले जात आहे. भारताच्या एकात्मतेत व अखंडतेमध्ये भारतीय संविधानाचे योगदान अनमोल आहे. भारतीय संविधानाच्या या महानतेचा जागर या अमृत महोत्सवामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून एरंडोल जिल्हा जळगाव येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन लवकरच केले जात आहे. या राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेच्या माध्यमातून घराघरापर्यंत भारतीय संविधान पोहोचविण्याचा संकल्प आहे. भारतीय संविधानाच्या समतेचा विचार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद नियोजन समिती स्थापन केली जात आहे. प्रत्येकाने राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद यशस्वी करण्यासाठी सहयोग द्यावा, अशी अपेक्षा या राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संयोजक माननीय भरत शिरसाठ यांनी दिनांक 22 डिसेंबर रोजी पारोळा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त केली. पूज्य भन्ते अमरज्योती बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेच्या कोर कमिटीचे सदस्य धनराज मोतीराय यांची विशेष उपस्थिती होती.
आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर नेतकर यांची पारोळा तालुका नियोजन समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सेवानिवृत्त सर्कल ऑफिसर अशोक मोरे यांची सचिव पदी तर सुदेश तायडे सर यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली. जितेश केदार रिपाई तालुका अध्यक्ष आठवले गट, राहुल केदार, पारोळा शहर अध्यक्ष रिपाई आठवले गट, सुदेश तायडे सर, वंचित बहुजन आघाडीचे गौतम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप सरदार सेवा नी.सर्कल मोरे आप्पा, पत्रकार योगेश महाले, पत्रकार राहुल सरदार, पप्पू शिंदे, रहेमद शेख अरमान, आजू शेख, राजू केदार सर इत्यादी उपस्थित होते. प्राध्यापक भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ हे पुस्तक व तृतीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन इत्यादी पुस्तके देऊन उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. या राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदे करिता पक्षभेद विसरून व्यापक प्रमाणात पारोळा तालुक्यामध्ये प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे आश्वासन जितेश केदार व राहुल केदार यांनी उपस्थितांना दिले.

