रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या सहाय्यक प्रांतपाल पदी रो.पूनम कोचर
![]()
रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या सहाय्यक प्रांतपाल पदी रो.पूनम कोचर
अमळनेर प्रतिनिधी
रोटरी क्लब अमळनेर चे सदस्य तसेच सन 2019-20 या वर्षातले अमळनेर क्लब चे अध्यक्ष रो.पूनम आसकरण कोचर यांची सन 2025-26 करिता रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या सहाय्यक प्रांतपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी कोरोना कळात उत्कृष्ट कार्य करत रोटरीची ईमेज जनमानसात उंचावली या कार्याची दखल घेत हि नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) रो. ज्ञानेश्वर (नाना) शेवाळे, नासिक यांनी निवड केलेली आहे. अमळनेर रोटरी क्लब ही 67 वर्षा पासून अमळनेर वासीयांना अखंडित सेवा देणारी सेवा भावी संस्था आहे, या क्लब चे सदस्य रो. पूनम कोचर यांना सहाय्यक प्रांतपाल म्हणून बहुमन चे हे पद देण्यात आले आहे त्यांच्या या नियुक्ती चे अभिनंदन होत आहे. अमळनेर रोटरी क्लब सदस्य तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या सदस्यांकडून देखील अभिनंदन होत आहे.

