संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने साने गुरुजी वाचनालयात अभिवादन
![]()
संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने साने गुरुजी वाचनालयात अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी वाचनालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले..
साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी प्रतिमेचे पूजन केले तर चिटणीस प्रकाश वाघ यांनी प्रतिमेचे माल्यार्पण केले..
यावेळी संत गाडगेबाबा म्हणजे विसाव्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीने पाहिलेले व अनुभवलेले एक आश्चर्य आहे! वैराग्याचा एक मूर्तीमंत आविष्कार या संताच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला अनुभवयास मिळाला. ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ असे भजन-कीर्तन करत अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनजागृतीचे विलक्षण कार्य करणारे गाडगेबाबा महाराष्ट्रातील लोकशिक्षणाचे चालते-बोलते विद्यापीठ होते. विज्ञानावर आधारित समाजप्रबोधन करणारे ते एक लोकोत्तर महापुरुष होते.अशी चर्चा मान्यवरांनी व्यक्त केले..
यावेळी संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करणेसाठी उपस्थित वाचनालायचे अध्यक्ष श्री. दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ, सहसचिव सुमित कुलकर्णी, जेष्ठ संचालक भीमराव जाधव, दिपक वाल्हे तसेच अमळनेर परीट समाज मंडळाचे पदाधिकारी व वाचक यांची विशेष उपस्थिती होती.

