टार्गेट पब्लिकेशन्सद्वारे विपला फाऊंडेशनच्या बालवाडी शिक्षकांसाठी प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन
1 min read

टार्गेट पब्लिकेशन्सद्वारे विपला फाऊंडेशनच्या बालवाडी शिक्षकांसाठी प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन

Loading

टार्गेट पब्लिकेशन्सद्वारे विपला फाऊंडेशनच्या बालवाडी शिक्षकांसाठी प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : टार्गेट पब्लिकेशन्स या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने, सेव्ह द चिल्ड्रन इंडिया (विपला फाऊंडेशन) च्या बालवाडी शिक्षकांसाठी ‘होलिस्टिक लर्निंग ऑफ किड्स’ या संकल्पनेवर एक कार्यशाळा आयोजित केली. हा उपक्रम टार्गेट पब्लिकेशन्सच्या ध्येयाशी सुसंगत असून, भारतातील बालमनांचा विकास करण्यासाठी दूरगामी आणि बालकल्याण केंद्रित विचारांनी शिक्षकांचे सक्षमीकरण करू पाहतो.
शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास

टार्गेट पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. सचिन कोडोलीकर यांनी या कार्यशाळेचे नेतृत्व केले. त्यांनी पुस्तकी ज्ञानाच्या सीमा ओलांडून विस्तृत अध्यापन पद्धती वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कोडोलिकर म्हणाले, “शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान देणे नव्हे , तर समाजासाठी सकारात्मक योगदान देऊ शकतील, विवेकशील वर्तन करतील आणि इतरांसाठी सहानुभूती बाळगतील अशा सर्वांगीण व्यक्तींना घडविणे.” टार्गेट पब्लिकेशन्स असे मानते की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 यात योजिल्याप्रमाणे मुलांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसह आवश्यक जीवन कौशल्ये विकसित व्हावीत, याकरिता शिक्षकांना पूरक वातावरण निर्माण करता आले पाहिजे आणि त्यासाठी त्यांना सक्षम करणे महत्त्वाचे आहे.
पालकांच्या समुपदेशनात शिक्षकांची भूमिका
श्री.कोडोलीकर यांनी 40 बालवाडी शिक्षकांशी परस्परसंवादी चर्चा केली आणि प्रत्यक्ष उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये संवाद, सहानुभूती आणि परस्पर आदर यांसारखी कौशल्ये बिंबवण्यासाठी प्रोत्साहन दिले. पालकांचे समुपदेशन करण्यात शिक्षकांची भूमिका अधोरेखित करत, शिक्षणाचा विस्तार वर्गाबाहेर आणि घरगुती वातावरणात झाला पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
शिक्षकांनी सांगितलेले अनुभव

या सत्रातील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थ्यांनी भविष्यात कशारितीने आपले स्मरण केलेले आपल्याला आवडेल, याबाबत शिक्षकांनी विचार केला. काही शिक्षकांनी त्यांच्या विपला फाऊंडेशनमधील पस्तीसहून अधिक वर्षांच्या अनुभवांमधून हृदयस्पर्शी गोष्टी सांगितल्या.

कार्यशाळेतून शिक्षकांना मिळालेली प्रेरणा

विपला फाऊंडेशनच्या समन्वयक समीक्षा मयेकर, यांनी या सत्राबद्दल आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली, “कार्यशाळा खरोखरच प्रेरणादायी होती. आमच्या शिक्षकांमध्ये नवीन उत्साह दिसून आला आणि त्यांनी यातून अध्यापनपद्धती समृद्ध करण्यासाठी व्यावहारिक योजना समजून घेतल्या असतील असा मला विश्वास आहे. आम्ही टार्गेट पब्लिकेशन्सकडून भविष्यातही अशा प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करतो.”

टार्गेट पब्लिकेशन्सचा विश्वास आहे की शिक्षणामुळे जबाबदार आणि सहानुभूती असलेले नागरिक तयार होण्यास मदत होईल आणि तेच विद्यार्थी भविष्यात देशाचे नेतृत्व करण्यास समर्थ असतील. यासारख्या कार्यशाळा शिक्षकांना केवळ व्यावहारिक शिक्षण पद्धतींनी सुसज्ज करत नाहीत तर, सर्वांगीण विकास हा दर्जेदार शिक्षणाचा पाया आहे याची पुष्टी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *