आपल्या मुलांना आधी माणूस म्हणून घडवा – संजय आवटे  नोबेल व्याख्यानमालेत प्रतिपादन इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान
1 min read

आपल्या मुलांना आधी माणूस म्हणून घडवा – संजय आवटे नोबेल व्याख्यानमालेत प्रतिपादन इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

Loading

आपल्या मुलांना आधी माणूस म्हणून घडवा – संजय आवटे

नोबेल व्याख्यानमालेत प्रतिपादन
इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

जळगाव – सध्याचा काळ पाहता आपल्या मुलांना आधी माणूस म्हणून घडवा.असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व लेखक संजय आवटे यांनी केले. नोबेल फाउंडेशन तर्फे पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त आयोजित नोबेल व्याख्यानमालेत चला नवी पिढी घडवूया या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका निशा जैन ,डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड ,कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डॉ. प्रमोद माहूलीकर, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल पी देशमुख , सामाजिक कार्यकर्ते अभियंता एम एम पाटील नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ता यादीत येऊन भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सेवा निवृत्ती निमित्त डॉ पी पी माहुलीकर तसेच षष्ठीनिमित्त एम एम पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना श्री आवटे म्हणाले की, सध्याचा काळ हा समान संधीचा काळ आहे. उच्च नीच, जात-पात ,धर्मपंथ, शहर -गाव असा कोणताही फरक आता प्रगतीला बाधा ठरू शकत नाही. आपल्या मुलांना या संधीचा लाभ घेऊ द्या.आई-वडिलांनी आपली स्वप्न मुलांवर लादू नये.नोबेल फाउंडेशनच्या कार्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मुलं अवकाश वीर व शास्त्रज्ञ होण्याची स्वप्न पाहत आहेत ही खरंतर ग्रामीण भागातील विज्ञान क्रांती आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगती करत असताना मुलांना सामाजिक भान शिकवायला हवे उड्डाणपूल बांधून जर उड्डाणपूलांवर सामाजिक दंगली होत असतील तर असा विकास नवीन पिढीसाठी घातक ठरणार आहे. जेव्हा सामान्य व्यक्तीला देशभरात कोणत्याही ठिकाणचे पाणी पिताना विचार करावा लागणार नाही, प्रत्येकाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करावासा वाटेल ,आपल्या परिवारातील व्यक्तींना सार्वजनिक रुग्णालयात ऍडमिट करावेसे वाटेल आणि मुलांना सहकारी शाळेत प्रवेश घ्यावासा वाटेल त्याला खरा विकास म्हणता येईल. नोबेल फाउंडेशन ने उभारलेले कार्य राज्यातील अतिशय वेगळे आणि दूरदर्शी आहे. आपल्या मुलांना घडवितांना पालकांनी नव्या युगाची भाषा समजून घेणे आवश्यक आहे.युट्युब, सोशल मीडिया नव्या युगाची साधने आहेत.तरुणांशी बोलताना त्यांना बोल न लावता त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता पाटील यांनी तर प्रास्ताविक नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप निळकंठ गायकवाड यांनी केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी नोबेल फाउंडेशनच्या संचालिका जयश्री पाटील राजेंद्र पाटील अक्षय देवरे जयेश वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा द्वारा इसरो सहलीसाठी निवड झालेल्या व सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी
इयत्ता 5 वी
अथर्व दंगाने
परम अजयकुमार पाटील
इयत्ता 6वी
पार्थ उमेश विसपुते
तन्मय यशवंत गांगुर्डे
श्रीरंग सतीश पिहूल
कुशल विलास अमृतकर
रियांश शिंपी
इयत्ता 7वी
विभोर अजितकुमार वाणी
निरंजन महेश बऱ्हाटे
अथर्व किरण पाटील
इयत्ता 8वी
स्वरीत रमेशसिंग पाटील
सुयोग सोनवणे

इयत्ता 9वी
भावेश राजेंद्र वाघ
श्रावण संजय नारखेडे दर्शन
सुनील बडगुजर
इयत्ता 11 वी
जय परेश नेवे

फोटो कॅप्शन- श्री संजय आवटे यांचा सन्मान करताना अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका निशा जैन आणि डायटचे निवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड ,डॉ पी पी माऊलीकर

 

नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा द्वारा इसरो सहलीसाठी निवड झालेल्या व सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी
इयत्ता 5 वी
अथर्व दंगाने
परम अजयकुमार पाटील
इयत्ता 6वी
पार्थ उमेश विसपुते
तन्मय यशवंत गांगुर्डे
श्रीरंग सतीश पिहूल
कुशल विलास अमृतकर
रियांश शिंपी
इयत्ता 7वी
विभोर अजितकुमार वाणी
निरंजन महेश बऱ्हाटे
अथर्व किरण पाटील
इयत्ता 8वी
स्वरीत रमेशसिंग पाटील
सुयोग सोनवणे

इयत्ता 9वी
भावेश राजेंद्र वाघ
श्रावण संजय नारखेडे दर्शन
सुनील बडगुजर
इयत्ता 11 वी
जय परेश नेवे

फोटो कॅप्शन- श्री संजय आवटे यांचा सन्मान करताना अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका निशा जैन आणि डायटचे निवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड ,डॉ पी पी माऊलीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *