खेळांमुळे नेतृत्व गुणाचा विकास – मुख्याध्यापक अनिल महाजन, महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न…
![]()
खेळांमुळे नेतृत्व गुणाचा विकास –
मुख्याध्यापक अनिल महाजन
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न…
अमळनेर प्रतिनिधी- महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये शालेयस्तरावर हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ..या स्पर्धेमध्ये लंगडी, लिंबू चमचा ,संगीत खुर्ची ,कबड्डी ,रस्सीखेच गोणपाट स्पर्धा घेण्यात आल्या..
क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन , क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के,व ईश्वर महाजन, हरी माळी यांनी केले.
विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धा संदर्भामध्ये सविस्तर माहिती व नियम क्रीडा शिक्षकांच्या सोनटक्के यांनी सांगितले व त्यांना सहकार्य स्काऊट शिक्षक हरी माळी यांनी केले.
लंगडी स्पर्धेमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थिनी शुभांगी पाटील प्रथम तर आठवी मध्ये तनुश्री सोनवणे द्वितीय क्रमांकाने विनर ठरल्या.. लिंबू चमचा स्पर्धेमध्ये आठवीतून प्रथम अर्पिता बोरसे, तर इयत्ता नववीतून नूतन पाटील प्रथम आली.. विद्यार्थ्यांमध्ये प्रणव माळी ,हिमांशू पाटील, आर्यन शिंदे यशस्वी झाले.
गोंणपाट स्पर्धेमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थिनी निशा जाधव विनर ठरली

रस्सीखेच स्पर्धेत इयत्ता आठवीतून प्रथम चेतन महाजन , मुलीमध्ये नववी कोमल जाधव,मुलामध्ये शिवम भिल, इयत्ता दहावी दुर्गेश महाजन विनर ठरले…
संगीत खुर्ची स्पर्धेत इयत्ता आठवीतून खुशी माळी, इयत्ता नववी गिरीजा महाजन व आठवीतून विद्यार्थ्यांमध्ये गणेश पाटील विनर ठरले..
कबड्डी स्पर्धेमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनीं दहावीच्या विद्यार्थिनींचा पराभव करत गिरीजा माळी, शुभांगी पाटील, वैष्णवी भरत पाटील, वैष्णवी श्याम पाटील, कोमल जाधव, निशा जाधव ,कांचन जाधव यांनी पराभव करत विनर ठरल्या..
यावेळेस विविध स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अतिशय आनंदाने वातावरणामध्ये शालेय स्पर्धा उत्साह पूर्ण वातावरणात यशस्वी झाल्या.. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षीस दिले जाणार आहे..
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेणे महत्त्वाचे आहे.. स्पर्धेत यश अपयश येत असते पण या शालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास होतो असे त्यांनी सांगितले..

