झांबरे विद्यालयात गीता जयंती आणि भाषिक एकता दिन साजरा*
![]()
झांबरे विद्यालयात गीता जयंती आणि भाषिक एकता दिन साजरा
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित माध्यमिक विद्यालयात आज मोक्षदा एकादशी निमित्ताने गीता जयंती साजरी करण्यात आली तसेच सुब्रमण्यम भारती यांच्या जन्मदिवसानिमित्ताने भाषिक एकता दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमद् भगवद्गीतेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे पर्यवेक्षक पालवे सर यांनी केले
त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचा तेरावा अध्याय पठण केला तसेच शिक्षक संदेश कराळकर यांनी भगवद्गीते विषयी माहिती सांगितली.
महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंती निमित्त भाषा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी भारतातल्या विविध प्रांतातील वेशभूषा करून भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा मराठी, हिंदी, इंग्रजी ,संस्कृत, तेलगू, मल्याळम, तमिल गुजराती, मैथिली, पंजाबी या भाषांमध्ये सादर केले आणि भाषिक एकतेचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी रोशनी कोळी निर्मल चतुर ,प्रतिभा लोहार, पराग राणे ,विवेक मोरे यांनी परिश्रम घेतले.

