मायेची उब आणि शिक्षणाची भूक या संकल्पनेतून……*
![]()
*मायेची उब आणि शिक्षणाची भूक या संकल्पनेतून……*
*उदयकाळ फाऊंडेशन पुणे* आयोजित पुरंदर तालुक्यातील अति-दुर्गम व डोंगराळ भागात वास्तव करणाऱ्या आदिवासी आदिवासी पाडा बहिरवाडी येथील प्राथमिक शाळेतील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिनांक १०/१२/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगण येथे नियोजित वेळेत शैक्षणिक मार्गदर्शन व ३५ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.
उदयकाळ फाउंडेशन ही संस्था गेली पाच वर्षापासून पुरंदर तालुक्यातील विविध आदिवासी पाड्यांमध्ये काम करते आहे. कोरोनाच्या महामारी मध्ये संस्थेने लोकांना घरपोच अन्नधान्याचे किट वाटप केले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सॅनिटरी पॅड वाटप केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक काम संस्थेच्या वतीने करण्यात येते. बहिरवाडी या गावांमध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्षरोपण लागवड करण्यात आली होती. अशी विविध कार्यक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असतात.
आज जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना थंडीत प्रचंड असल्याकारणाने स्वेटरची अत्यंत आवश्यक होती व ती गरज लक्षात घेऊन संस्थेने विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केले. सदरील कार्यक्रमास उपस्थित मान्यवर उदयकाळ फाउंडेशनचे संचालक मयूरजी बागुल सर, आदिवासी सामाजिक कार्यकर्ता आकाश भगत ,बहिरवाडी ग्रामपंचायत सदस्य अमोल भगत, जिल्हा परिषद शाळा शिक्षक रूपाली गलंगे तसेच मुख्याध्यापक अनिल गलंगे सर, आरोग्य विभागाच्या आशाताई सुनिता ढगारे, लक्ष्मण ढगारे, मयुरी भगत, पार्वती भगत, स्वाती वाघमारे, संजय कारकुड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित मान्यवराचा सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांस तर्फे ग्रामपंचायत सदस्य अमोल भगत यांनी केले व मयूर बागुल सर व आकाश भगत यांनी तालुक्यातील बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करून शैक्षणिक विषयावर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली.
आभार प्रदर्शन जिल्हा परिषद शिक्षक अनिल गलंगे यांनी केले.
*तिमीराकडून तेजाकडे*

