झांबरे विद्यालय महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..
1 min read

झांबरे विद्यालय महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..

Loading

*झांबरे विद्यालय महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

के.सी.ई. सोसायटी संचालित झांबरे ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. शाळेचे शिक्षक श्री संदेश कराळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. त्यावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी त्याची योग्य उत्तरे दिली ‌. कार्यक्रमाला शाळेचे पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे एस एच बाविस्कर,डी.ए. पाटील, ए एन पाटील आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूनम कोल्हे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *