“कविता आणि समर्पण: ‘सर्वकाल’ मधील आयु. नामदेव रामचंद्र सपकाळे यांच्या प्रेरणादायक आठवणी” ,श्री.प्रदीप पाटील यांच्या शुभहस्ते अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिकेशन्स जळगावच्या सभागृहात संपन्न
1 min read

“कविता आणि समर्पण: ‘सर्वकाल’ मधील आयु. नामदेव रामचंद्र सपकाळे यांच्या प्रेरणादायक आठवणी” ,श्री.प्रदीप पाटील यांच्या शुभहस्ते अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिकेशन्स जळगावच्या सभागृहात संपन्न

Loading

 

“कविता आणि समर्पण: ‘सर्वकाल’ मधील आयु. नामदेव रामचंद्र सपकाळे यांच्या प्रेरणादायक आठवणी”

श्री.प्रदीप पाटील यांच्या शुभहस्ते अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिकेशन्स जळगावच्या सभागृहात संपन्न

जळगांव प्रतिनिधी

प्रिय,मित्रांनो या वर्षी माझा “अंतःस्वर” आणि “अस्वस्थतेपार” हे दोन कवितासंग्रह आजपर्यंत प्रकाशित झालेयेत.आता नवा कवितासंग्रह “सर्वकाल” चे प्रकाशन आज रोजी प्राईम पब्लिकेशन्स हाऊसचे प्रकाशक श्री.प्रदीप पाटील यांचे शुभहस्ते अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिकेशन्स जळगावच्या सभागृहात संपन्न झालेय.प्राईम पब्लिकेशन्स हाऊस तर्फे प्रकाशित होणारा “सर्वकाल” हा माझा पहिलाचा संग्रह आहे.माझ्या एकूण कवितासंग्रहातील हा १९वा कवितासंग्रह आहे.ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर यांचे अंतर्भेदी मलपृष्ठ अभिप्राय आणि ज्येष्ठ समीक्षक डाॅ फुला बागुल यांची मर्मभेदी विवेचक प्रस्तावना तसेच भ.मा. परसवाळे यांचेआशयगर्भ मुखपृष्ठ या संग्रहास लाभलेले आहे. माझे सासरे देशाचे लढवय्ये सैनिक स्मृतीशेष आयु.नामदेव रामचंद्र सपकाळे यांच्या स्मृतीस हा संग्रह अर्पण केलाय.या संग्रहाचे स्वागत मराठी काव्यरसिक करतीलच अशी माझी कवी म्हणून नम्र अपेक्षा आहे.प्रदीप पाटील यांना प्रकाशनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.त्यामुळे मराठी साहित्य प्रातांत त्यांची अनोखी मुद्रा उमटेलच यात शंका नाही. “सर्वकाल” नंतर “या नव्या मोसमात” “अर्थाक्षरी” हे नवे दोन संग्रह प्राईम पब्लिकेशन्स तर्फे ३१डिसेंबर २०२४अखेर लवकरच येत आहे.तसेच अथर्व पब्लिकेशन्स जळगाव वतीने माझा “अंतःस्वर” हा कवितासंग्रह तसेच प्रशांत पब्लिकेशन्स जळगाव तर्फे “अस्वस्थतेपार” हाही संग्रह प्रकाशित झालाय. अथर्व पब्लिकेशन्स तर्फे पुन्हा याच वर्षात “अखंडीत” हाही कवितासंग्रह प्रकाशित होतोय. “अंतःस्वर” ते “अखंडीत” असे सहा संग्रह याच वर्षात प्रकाशित होत असल्याचा मला मनःस्वी आनंद आहेच.पुढच्या वर्षी “उठावाचे तप्त दिवस” वर्णमुद्रा पब्लिकेशन्स शेगाव तर्फे तर “आजकाल माझे हे अस्वस्थपण” हा कवितासंग्रह मुक्तसृजन संवाद ठाणे यांनी याच वर्षी स्विकारून प्रकाशित करण्याचे मान्य केलेय.या नंतरही २०२६ ला “नवे अभंग”,”सर्वदूर तापलीय हवा”,”तुझे आकाश” “जगण्याचे धागे””किनारा” “आतले आवाज”,”पुन्हा नव्याने” “आंतरिक अस्वस्थ दीर्घ संवाद”
आणि “”अभिवादनाच्या कविता” असे संग्रह जे लिहून ठेवलेले आहेत.तेही प्रकाशित होताहेत.

 

मित्रांनो,कविता माझा पिच्छा गेली चाळीस वर्षेपासून सोडत नाहीय. आणि शेवटच्या श्वासांपर्यंत ती सोबतच राहील असेच वाटतेय आजकाल.

माझ्या कवितेवरील आपले प्रेम असेच राहू द्यावे ही विनंती.

“सर्वकाल”
प्राईम पब्लिकेशन्स,जळगाव.
मूल्य:१५०/-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *