बालविवाह निर्मूलनासाठी संकल्प: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम
![]()
बालविवाह निर्मूलनासाठी संकल्प: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर आणि अन्य संबंधित संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बालविवाहाच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकणाऱ्या प्रतिज्ञा दिल्या गेल्या. जिल्ह्यातील विविध शाळांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.देवगांव देवळी ता अमळनेर येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमधील मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम सांगितले, तर सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर. महाजन यांनी प्रतिज्ञा दिली. यावेळी शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व शाळांनी या उपक्रमात दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आणि बालविवाह विरोधात जनजागृती करण्यासाठी आणखी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

