पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे‘ ‘संविधान दिन’ साजरा अमळनेर
1 min read

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे‘ ‘संविधान दिन’ साजरा अमळनेर

Loading

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे‘ ‘संविधान दिन’ साजरा
अमळनेर

भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला 75 वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या, असे आवाहन केले आहे.
घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या विषयी समाजामध्ये पुरेशी जागरूकता नसल्याने लोकशाहीवर निष्ठा असलेल्या संघटनांच्या मागणीनुसार राज्य सरकारने २००८ मध्ये शासकीय अध्यादेश काढला आहे,
संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला असला, तरी संविधान दिन साजरा करण्याबाबत मोठी उदासिनता दिसून येते. केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन करण्यात आले

आज रोजी पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली करण्यात आले
यावेळी प्राचार्य.पी.एस पाटील, प्रा.डॉ.विजयकुमार वाघमारे प्रा.डॉ.भरत खंडागळे, प्रा.डॉ.जगदीश सोनवणे डॉ.धनराज ढगे, डॉ.श्वेता वैद्य प्रा.अस्मिता सरवैय्या, प्रा.अनिता खेडकर शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *