मारवड चे माजी सरपंच वसंतराव चुडामण पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन उदया सकाळी 11 वाजता अंतयात्रा
![]()
मारवड चे माजी सरपंच वसंतराव चव्हाण पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
उदया सकाळी 11 वाजता अंतयात्रा
अमळनेर प्रतिनिधी- शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व मारवड येथील माजी सरपंच वसंतराव चुडामन पाटील (वय ७८) यांचे आज २५ रोजी अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उदया २६ रोजी सकाळी ११ वाजता जुने गाव, मारवड येथील राहत्या घरापासून निघणार आहे. ते भैय्यासाहेब पाटील यांचे बंधू, व नंदकिशोर पाटील यांचे वडील होत. वसंतराव चूडामन पाटील हे दहा वर्ष सरपंच होते, तसेच अमळनेर बाजार समितीचे संचालकपद ही भूषवले होते. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

