संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावात कवी संमेलन संपन्न!!!
1 min read

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावात कवी संमेलन संपन्न!!!

Loading

बानाई संस्था व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्यातर्फे संविधानावर कविता सादरीकरण !!!
‌‌
‌ संविधान हा देशाचा प्राण आहे. संविधान म्हणजे मानवतेचे गान.. संविधान देशाचा स्वाभिमान आहे. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने त्या निमित्ताने बाणाई सामाजिक संस्था व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्यातर्फे जळगाव येथील सामाजिक न्याय विभाग येथे संविधानावर जनजागृती पर कवी संमेलन पार पडले. बानाई ही संस्था जळगाव मध्ये विविध सामाजिक उपक्रम करीत असते. सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतज्ञ साठी विविध वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा या प्रकारच्या स्पर्धा घेत असते. या संस्थेचे अध्यक्ष आर .जी. सुरवाडे हे पुरोगामी विचाराचे लोन समाजापर्यंत पोहोचवण्याचे अप्रतिम काम करीत असतात. त्यांच्यासोबत ज्योती वाघ या सामाजिक कार्यकर्त्या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून काम पाहतात. जळगाव मध्ये संपन्न झालेल्या या कवी संमेलनाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकूण 19 स्पर्धक त्यांनी अप्रतिम अशा अशा कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सर्वप्रथम महापुरुषांचे प्रतिमापूजन करण्यात आले. संस्थेचा परिचय आज सुरवाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय भरतजी शिरसाठ यांनी आपली ‘विवंचना’ ही ‘खैरलांजी आणि भीमा कोरेगाव’ या कविता संग्रहातील संविधानाची आवश्यकता व्यक्त करणारी कविता सादर केली. कविता कशी असली पाहिजे, कविता लेखन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल विवेचन केले. कविता ही समाजमन तयार करण्याचे काम करते. म्हणून कवींना मुव्हर्स अँड शेअर्स म्हणतात. अमेरिकन कवी रॉबर्ट फास्ट याच्या द वूड्ज आर लवली डार्क अँड डीप… या कवितेच्या सुंदर ओळी सांगून जीवनात उद्दिष्ट गाठणे किती महत्त्वाचे आहे, याचे विवेचन त्यांनी केले.
यानंतर कवी संमेलन पार पडले. कवी संमेलनात ‘बाबा तुझे प्रयत्न फळाला आले, बाबा तुम्ही सांगितले शिका, बाबा तुम्हाला शब्दात व्यक्त करणे अवघड, आंबेडकर समाजात जन्म घेतला, बिक रहा है सबकुछ यहा, बाबासाहेबांनी संविधान दिले, बाळ भिमाचे संविधान, रक्तात भिम माझ्या डोळ्यात भीम आहे, जनम -जनम का रिश्ता है जय भीम का हमारा, अरे गड्या वाच तू सविधान, राष्ट्रीय एकात्मता, धनी मलाही दाखवाना तुमची मुंबई, गर्दी तुम्ही सामील होता, सांग कधी कळणार बुद्ध मनातला, प्रश्न, कहानी दोनो की, माझ्या भिमाचा रुबाब लय भारी, माणूस, राजश्री शाहू अशा अप्रतिम अशा कविता कवींनी सादर केल्या. कवितेचा आशय अतिशय भारदस्त होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट विजयकुमार कस्तुरे , प्रसिद्ध शाहीर, कवी, गायक होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हटले की कवींच्या कविता ऐकून मन भरून आले. त्यांनी कवींना म्हटले की तुम्हीच नेपोलियन आहात. तुमच्यात समाज जागृत करण्याची उर्मी आहे. परिवर्तन करणारे असंख्य नसतात. आज असंतुलित माणसांना संतुलित विचाराची गरज आहे. हे शब्द माझे झाले मुके तरी हमखास बोलतील विद्रोहाची भाषा असे सांगून पुस्तके भरपूर आहे पण माणसात माणूस सापडत नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांनी लेखनी ही तलवार केली आणि अन्यायाची दुर केला. अन्याय करणारा व अन्याय सहन करणारा हे दोन्ही दोषी आहेत -अब्राहम लिंकन यांचे उदाहरण देऊन त्यांनी अन्याय विरुद्ध आवाज उठवणारा कमी असतो असे नमूद केले. कोणत्या जातीत जन्माला आलो याला महत्व नाही. यावे तसेच जावे असे जीवन नसावे. मानवतेवर प्रेम करा असे आपल्या भाषणात प्रतिपादन केले. कार्यक्रमासाठी नंदा माघाडे, डी डी पाटील, दिनेश चव्हाण, यावलकर, अशोक सैंदाणे, संतोष साळवे, कुशल दुसाने, ज्योती वाघ, भीमराव सोनवणे, ताईसाहेब, विजय महाजन, विजय सूर्यवंशी, प्रकाश पाटील, अंकुश कडेगाव, बीवी खरात, बबन महामने, ईश्वर वाघ इत्यादी कवींनी भाग घेऊन उत्कृष्ट कविता सादर केल्या. विचार मंचावर माननीय भरतजी शिरसाठ महासचिव बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्र व अध्यक्ष समतावादी साहित्य मंडळ , मा. आर.जी.सुरवाडे, अध्यक्ष, बाणाई संस्था जळगाव. मान. ईश्वर वाघ, शाहीर ,कवी, गायक, कार्यक्रमाचे अध्यक्ष‌ एडवोकेट विजयकुमार कस्तुरे, प्रसिद्ध कवी बुलढाणा तसेच मनोहर तायडे बानाई सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.डी .कोळी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्योती वाघ यांनी केले. कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते लेखन मंच साप्ताहिक उपसंपादक एस.एच. भवरे यांची उपस्थिती होती. अनेक रसिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *