जायन्ट्स ग्रुपचा अभिनव उपक्रम, शुभेच्छा संदेशातून मतदान जनजागृती
![]()
जायन्ट्स ग्रुपचा अभिनव उपक्रम
शुभेच्छा संदेशातून मतदान जनजागृती
अमळनेर प्रतिनिधी
मतदान हा राष्ट्रीय सण मानला जातो, आणि या सणासर्व व्यासपीठावर वाढविण्यासाठी अमळनेर येथील नव्याने स्थापन झालेल्या “जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर”ने निर्णय घेतला आहे. संस्थापक अध्यक्ष श्री सुनील पंडितराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या सहकारी मित्रांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे ठरवले आहे.
उपाध्यक्ष रमेश महाजन, सचिव प्रशांत भटू पाटील, खजिनदार ॲड. राजेंद्र चौधरी, मार्गदर्शक Dr. महेश पाटील, प्रो. प्रवीण भावसार, चंदू नाना बडगुजर सर, तसेच सदस्य संतोष वाघ, भटू पाटील, रवींद्र पाटील, दीपक मणीलाल, महेश पाटील, प्रदीप शिंगणे या सर्वांच्या सहकार्याने “मतदार जनजागृती मोहीम” हाती घेण्यात आली आहे.
या उपक्रमानुसार 4000 पोम्लेट तयार करून स्थानिक पेपरमध्ये वितरीत करण्यात येणार आहेत, ज्यामुळे मतदार जागृत होऊन मतदानाचे टक्केवारी वाढवण्यात मदत होईल. या उपक्रमात आर्थिक सहकार्याचे श्रेय जायन्ट्स ग्रुपचे उपाध्यक्ष व प्रोजेक्ट चेअरमन श्री रमेश महाजन यांना जाते, ज्यांनी पोम्प्लेट तयार केले.
जायन्ट्स ग्रुपच्या अध्यक्ष श्री सुनील पाटील आणि खजिनदार ॲड. राजेंद्र चौधरी यांनी पोम्प्लेटची रचना केली. या उपक्रमाचे अमळनेर शहरातील सर्व स्तरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
आपल्या सहभागाबद्दल अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा विशेष आभार. मतदानाच्या दिवशी, 20/11/2024, बुधवार, सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाला विसरू नका!

