*ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती अंतर्गत रांगोळी स्पर्धा आणि पथनाट्य सादर*
![]()
*ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती अंतर्गत रांगोळी स्पर्धा आणि पथनाट्य सादर*
एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात 13 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला त्याचप्रमाणे इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी *मतदान* हे पथनाट्य एम.जे कॉलेज चौफुली जवळ तसेच झांबरे विद्यालयाच्या ग्राउंडवर सादर केले.यावेळी नोडल अधिकारी तथा मनपा सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड शालेय पोषण अधीक्षक विजय पवार बी एल.ओ.सुपरवायझर प्रणिता झांबरे, बी.एल.ओ. महेंद्र नेमाडे, सचिन सोनार, योगेश पवार, आकाश कोळी, विजय पाटील उपस्थित होते. रांगोळी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. रांगोळी स्पर्धा आणि पथनाट्याचे नियोजन प्रतिभा लोहार पराग राणे, विवेक मोरे, मनीषा जयकर, दिपाली खडके, प्राजक्ता देवरे, धनश्री सोने, नूतन वराडे यांनी केले.

