मतदानाचा हक्क बजवा एक हजार विद्यार्थ्यांनी लिहिले पालकांना पत्र ओरियन स्टेट बोर्ड शाळेचा निवडणूक जनजागृतीसाठी उपक्रम
![]()
मतदानाचा हक्क बजवा एक हजार विद्यार्थ्यांनी लिहिले पालकांना पत्र
ओरियन स्टेट बोर्ड शाळेचा निवडणूक जनजागृतीसाठी उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी -विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदान टक्केवारी वाढण्यासाठी जळगाव शहर विधानसभा मतदार संघात स्वीप नोडल अधिकारी तथा मनपा सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, अभियंता प्रकाश पाटील, योगेश बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली दि 8 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रम शहरात राबवले जात आहेत.आज दि 13 नोव्हेंबर रोजी ओरियन स्टेट बोर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी पत्र लिहून आपल्या पालकांना मतदानाचे महत्व पटवून देत मतदान करण्याचा आग्रह केला. याप्रसंगी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार,शाळेचे प्राचार्य श्रीधर सुनकरी सर,उपप्राचार्या श्रीमती रजनी गोजोरेकर, सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.

