महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा”  शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस तिल्लोत्तमाताई पाटील
1 min read

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा” शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस तिल्लोत्तमाताई पाटील

Loading

“महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा”

शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस तिल्लोत्तमाताई पाटील

अमळनेर प्रतिनिधी: महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांना अमळनेर मतदारसंघात मतदारांचा उत्कृष्ट आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता शासनाच्या कार्यप्रणालीकडे कंटाळली आहे, हे स्पष्ट झाल्याचे शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस तिल्लोत्तमाताई पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील राजकारणामध्ये घाणेरडेपणाचे वर्तन वाढले आहे. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळत नाही. अनेक घोषणा करण्यात आल्या, पण महायुती सरकारने कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढला आहे.
लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या समर्थनामुळे विधानसभा निवडणुका देखील यशस्वी होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी, कर्मचारी वर्ग, आणि महिलादेखील महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, यामुळे अमळनेर विधानसभा निवडणुकीत डॉ अनिल नथ्थू शिंदे यांचा विजय निश्चित दिसतो.
या लढाईत धनशक्तीला विरोध करण्यात येणार आहे आणि अमळनेरचे मतदार सुज्ञ असून, ते महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देतील, असे त्यांनी सांगितले. डॉक्टर शिंदे हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या ज्ञानामुळे त्यांना विजय मिळवण्यात मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तिल्लोत्तमाताई पाटील यांच्या सांगण्यानुसार, राष्ट्रवादी पक्षातील पाच ते सात उमेदवार इच्छुक होते, पण काँग्रेसला जागा मिळाल्यामुळे तिन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने डॉ शिंदे यांच्या प्रचारात काम करत आहेत. ग्रामीण भागात त्यांना कार्यरत पाठिंबा मिळत आहे, जो त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *