मागील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच निम मांजरोद पुल झाला रद्द,  डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब,
1 min read

मागील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच निम मांजरोद पुल झाला रद्द, डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब,

Loading

मागील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच निम मांजरोद पुल झाला रद्द,

डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास अनेक स्थानिक प्रश्न लागणार मार्गी:- मगन भाऊसाहेब,

अमळनेर प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे अभ्यासू उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे हेच उमेदवार आहेत. तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त मतांनी निवडूण येण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा असे काग्रेसचे पदाधिकारी निम येथील कपीलेश्वर संस्थानचे विश्वस्त मगन भाऊसाहेब यांनी सांगितले..
अमळनेर तालुक्यातील महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांच्या खोटया आश्वासनांना मतदार बांधवांनी भिक घालू नये.समाजात जातीपातीचे राजकारण करून लाखो रुपायांची विकासकामे फक्त कागदावर आहेत.. पण तालुक्यातील अनेक प्रश्न सोडता आले नाही हि शोकांतिका आहे. म्हणून तालुक्यातील मतदार बांधवानो डॉ अनिल शिंदे यांच्या नावाने महाविकास आघाडी पक्षाचे चांगला उमेदवार दिला आहे..
दोन्ही दादांना आपण संधी दिली आहे या वेळेस एक चांगला चेहरा व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमळनेर तालुक्याच्या विकासाचे व्हिजन असलेला माणूस डॉक्टर अनिल शिंदे आहे त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून सेवेची संधी द्यावी असे त्यांनी आवाहन केले..
अमळनेर तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अनिल नथु शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानंतर अमळनेर तालुक्याचा विकास, बेरोजगारी, कष्टकरी, दलित लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्यामालाला हमीभाव ,महीलांचे प्रश्न असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *