एच.आय. व्हीं. सह जीवन जगणाऱ्या अनाथ बालकांना सकस आहार किराणा किट वाटप  रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुद्देशीय संस्था यांचा संयुक्त उपक्रम
1 min read

एच.आय. व्हीं. सह जीवन जगणाऱ्या अनाथ बालकांना सकस आहार किराणा किट वाटप रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुद्देशीय संस्था यांचा संयुक्त उपक्रम

Loading

एच. आय. व्हीं. सह जीवन जगणाऱ्या अनाथ बालकांना सकस आहार किराणा किट वाटप

रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुद्देशीय संस्था यांचा संयुक्त उपक्रम

आज दिनांक 8/11/2024 रोजी
ओमकार अंध के व्ही के सोसायटी मुंबई यांच्या कडून किशोर देवरे यांनी 50 सकस आहार किट त्यांच्या स्वतःच्या खर्चातून अमळनेर येथे पार्सल द्वारे पोहचवले, व मकसुद भाई बोहरी यांच्या कडून 30 प्रोटीन किट देण्यात आले. आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना व मुलींना तसेच गरजु व्यक्ती यांना सकस आहार कीट व प्रोटीन किट चे वाटप अंकुर सेवा सेतू अंतर्गत करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रो.मकसुद भाई बोहरी , रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.ताहा बुकवाला, सचिव रो.विशाल शर्मा व रोटरी क्लब चे सिनियर मेंब रो. चेलाराम सैनानी व रो. डॉ दिलीप भावसार यांची उपस्थिती होती.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आधार संस्थेचे टीम मेंबर तौसिफ शेख ,दीपक विश्वेश्वर, उर्जिता शिसोदे, पुनम पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कापडे यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रो.ताहा बुकवाला यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *