अमळनेर विधानसभा मतदार संघातील शिरूड, कावपिंप्री, इंदापिंप्री, सुमठाणे, इधवे, जिराळी, पिंपळकोठा या गावाचे मतदारांशी संवाद साधत महाविकास आघाडीचे उमेदवार तथा काँग्रेसचे डॉ अनिल शिंदे व पदाधिकाऱ्यांचा प्रचार दौरा
![]()
अमळनेर विधानसभा मतदारसंघात *महाविकास आघाडीचे* उमेदवार *डॉ. अनिल नथ्थु शिंदे* यांनी काल संध्याकाळी अमळनेर विधानसभा मतदार संघातील शिरूड, कावपिंप्री, इंदापिंप्री, सुमठाणे, इधवे, जिराळी, पिंपळकोठा या गावाचे मतदारांशी संवाद साधत आपला प्रचार दौरा केला. सोबत महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते देखील उपस्थित होते डॉ. अनिल शिंदे यांनी या दौऱ्यात शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाचा अभाव, तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्यांचे सरकार राहील. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळेल आणि कोणावरही अन्याय होणार नाही.” अमळनेर विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांना त्यांनी आग्रह केला की, “मला चांगल्या मतांनी निवडून द्या आणि सेवेची संधी द्या.”
त्यांचा प्रचार
*अमळनेर*

विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन निश्चित आहे, याबद्दल श्रोतृकारांचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे. “जनता बोले परिवर्तन!” हेच जनतेचे वाक्य आता महत्त्वाचे ठरत आहे.
**🌟 हाथ बदलेगा हालात..✋**
डॉ. अनिल शिंदे यांच्या नेतृत्वात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये एकजुटीचे वातावरण निर्माण होत आहे.

