मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने व कर्तृत्व गौरव सन्मान सोहळ्याला मुख्यमंत्री पासून तर केंद्रीय मंत्री साहित्यिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या भरभरून शुभेच्छापत्र….
![]()
मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने व कर्तृत्व गौरव सन्मान सोहळ्याला मुख्यमंत्री पासून तर केंद्रीय मंत्री साहित्यिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या भरभरून शुभेच्छापत्र….
मराठी लाईव्ह न्युज चा पाचवा वर्धापन दिवस ६ नोव्हेंबरला दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित सन्मान सोहळा..
अमळनेर प्रतिनिधी- मराठी लाईव्ह न्युज या वेळ पोर्टलने पत्रकारिता क्षेत्राबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम गेल्या पाच वर्षापासून करत आहेत. मराठी लाईव्ह न्युज वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या पाठीवर शुभेच्छारुपी कौतुकाची स्थापना नेहमीच ठेवली आहे..
राज्यातील सगळ्या क्षेत्रातील बातम्यांना गेल्या पाच वर्षापासून यथायोग्य प्रसिद्ध दिली आहे याचे जाहिरातदार, वाचक साक्षीदार आहेत.. मराठी लाईव्ह न्युज ब्रीद वाक्य आहे *विश्वसनीयता हीच आमची ओळख…* या उक्तीप्रमाणे बातम्यांना सगळ्यात आधी तात्काळ प्रसिद्ध देण्याचे काम मराठी लाईव्ह ने केलेले आहे याचे सर्व वाचक जाहिरातदार साक्षी आहेत…
मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने व कर्तृत्व गौरव सन्मान सोहळयाला राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले, ना.नारायण राणे, मंत्री अनिलदादा पाटील, खासदार स्मिताताई पाटील, डॉ अमोल कोल्हे, रक्षाताई खडसे, सुधीर मनगुंटीवार वने सांस्कृतिक मंत्री, आमदार प्रवीण दरेकर, साहित्यिक प्रवीण दवणे,प्रसिद्ध प्रा वा. ना आंधळे, शशिकांतजी हिंगोणेकर ,शरद पाटील अमळनेर, लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संजय एम देशमुख सह अनेकांच्या शुभेच्छा पत्रांचा मराठी लाईव्ह न्युज वर वर्षाव होत आहे..
![]()
मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनाला कर्तृत्व गौरव सन्मान सोहळयाला सर्व पुरस्कार्थी बंधू भगिनी यांनी सह कुटुंब सहपरिवार ,मराठी लाईव्ह न्युज वर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार, पत्रकार बांधव, सामाजिक, राजकीय शैक्षणिक, साहित्यिक, आध्यात्मिक ,कृषी सर्व क्षेत्रातील बांधव भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी व

आम्हाला शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन मराठी लाईव्ह न्युज चे मुख्यसंपादक ईश्वर महाजन यांनी केले आहे..
सदर कार्यक्रम 6 नोव्हेंबर बुधवारी सकाळी दहा वाजता अमळनेर येथे जुना टाऊन हाँल साने गुरुजी ग्रंथालय समोर कार्यक्रम आयोजित केला आहे..



