नागपूर आर एस पी संघटनेची यशस्वी वाटचाल  कल्याण ठाणे जिल्ह्यातील आर एस पी युनिटला विशेष विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य करण्याची संधी.
1 min read

नागपूर आर एस पी संघटनेची यशस्वी वाटचाल कल्याण ठाणे जिल्ह्यातील आर एस पी युनिटला विशेष विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य करण्याची संधी.

Loading

नागपूर आर एस पी संघटनेची यशस्वी वाटचाल

कल्याण ठाणे जिल्ह्यातील आर एस पी युनिटला विशेष विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य करण्याची संधी.

ठाणे: कल्याण(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत,ठाणे जिल्ह्यातील आर एस पी युनिट ला ठाणे पालघर,नाशिक विभाग विभागीय समादेशक मनिलाल शिंपी,व ठाणे नवी मुंबई,पालघर दिलीप स्वामी यांचा नेतृत्वाखाली “विशेष पोलीस अधिकारी” म्हणून कर्तव्य करण्याची संधी.
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यकालामध्ये आरएसपी अधिकारी पथकाला “विशेष पोलीस अधिकारी”म्हणून कर्तव्य करण्याचे देण्यात यावी असा आदेश ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी,व मा. पोलीस आयुक्त ठाणे/नवी मुंबई/मिरा-भाईंदर वसई/विरार पोलीस आयुक्तालय तसेच मा. पोलीस अधीक्षक ठाणे/पालघर ग्रामीण यांना देण्यात आला आहे.आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे सेवाभावी कार्याबद्दल जिल्हाधिकारी मा.अशोक शिनगारे साहेब,उपजिल्हा निवडणूक अधिकारी मा.वैशाली माने मॅडम,पोलीस आयुक्त मा.आशुतोष डुंबरे साहेब, तसेच ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त मा. पंकज शिरसाट साहेब यांनी आर एस पी युनिटचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. ठाणे कल्याण डोंबिवली आर एस पी युनिट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण संघटन नागपूर संघटनेचे अध्यक्ष मा. संजयजी शेंडे, उपाध्यक्ष मा. पी एस महाजन, खजिनदार, मा.श्याम फाळके, प्रशिक्षण प्रमुख पोहरे सर, राज्य कायदेविषयक सल्लागार ऍड.डॉ. के.डी.पाटील, महासमादेशक मा. अनिल शेजाळे यांनी पुढील कार्य यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आर एस पी अधिकारी युनिटला विधानसभा निवडणूक 2024 या राष्ट्रीय कार्यात कर्तव्य करण्यासाठी संधी मिळावी यासाठी ठाणे पालघर नाशिक श्री.दिलीप स्वामी व श्री.मनिलाल शिंपी यांनी आरएसपी युनिटच्या कार्याची सर्व माहिती देऊन विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य करण्याची संधी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले.तसेच भिवंडी शहापूर आर एस पी समादेशक श्री. मंगेश भामरे, ठाणे शहर समादेशक श्री. बाळासाहेब साठे व एम एच हायस्कूलचे मुख्याध्यापक समादेशक श्री. सुनील पाटील, कळवा मुंब्रा आर एस पी समादेशक श्री संजय खैरनार, आर एस पी अधिकारी प्रा.दयानंद कांबळे, प्रा. बबन पाटील आर एस पी qअधिकारी पदाधिकारी यांनी मोलाचे विशेष परिश्रम घेतले.कल्याण डोंबिवली विभागिय समादेशक श्री.महादेव क्षिरसागर, समादेशक श्री.अनंत किनगे यांचेही सहकार्य लाभले आहे.कल्याण डोंबिवली व ठाणे जिल्ह्यापासून तर महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटला विशेष सहकार्य आणि प्रोत्साहन देणारे तसेच वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करणारे विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सुखदेव पाटील यांनी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *