अमळनेर शहरात आढळला दुर्मीळ अल्बीनो तस्कर जातीचा सर्प
![]()
अमळनेर शहरात आढळला दुर्मीळ अल्बीनो तस्कर जातीचा सर्प
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 27 ऑक्टोबर रोजी अमळनेर बाजार समितीच्या आवारात सर्प असल्याची माहिती मिळाली तात्काळ अमळनेर शहरातील सर्पमित्र गणेश शिंगारे व अविनाश परमार हे बाजार समितीच्या आवारात पोहोचले तो सर्प दुर्मीळ अल्बीनो जातीचा आहे हे दिसून आले सर्पमित्र शिंगारे व परमार यांनी सुरक्षित रीतीने दुर्मीळ अल्बीनो जातीच्या सर्पास रेस्क्यू केले .
श्री शिंगारे यांनी या सर्पाबाबतीत माहिती देतांना सांगितले की सदर सर्प हा दुर्मीळ अल्बीनोतस्कर जातीचा बिनविषारी सर्प असून , जन्मजात मेलेनिनच्या अनुपस्थितीमुळे अशाप्रकारे सर्प जन्माला येतो , ज्यांचा रंग त्यांच्या मूळ रंगापेक्षा वेगळा असतो सदर सर्प हा 90% अल्बीनोआहे 100% अल्बीनो सापाचे डोळे सुद्धा लाल , गुलाबी रंगाचे असतात परंतु आढळलेल्या सापाचे डोळे हे काळे आहे त्यामुळे हा सर्प 90 % अल्बीनोआहे , जन्मजात जनुकिय बदलांमुळे असें सर्प जन्माला येतात सदर घटना आमच्या प्राणि शास्त्रीय भाषेत दुर्मिळ मानली जाते , अल्बीनो साप सुंदर असले तरी , त्याना आरोग्याच्या अनेक समस्याचा सामना करावा लागतो जो त्यांच्या नॉन अल्बीनो नातेवाईकांना होत नाही सर्वात लक्षणीय म्हणजे अशा प्रकारच्या सापांना निसर्गात वास करतांना खुप अडचणी निर्माण होतात मुख्य म्हणजे मेलेनिन च्या अनुपस्थितीने ह्यांना उन्हाचा त्रास होतो , जास्त वेळ उन्हात राहिल्यास सनबर्न होण्याची भीती असते,दुष्टी दोष होण्याची शक्यता असते तसेच नैसर्गिक रंग नसल्याने यांचे नैसर्गीक छलावरण नष्ट होते रंग पांढरा , पिवळा , भूरा , गुलाबी असल्याने हे निसर्गातील ह्यांच्या नैसर्गीक शत्रूच्या सहज नजरेस पडतात व त्यांच्या तावडीत सापडून जीवास मुकतात , अश्या दुर्मीळ प्रजातीच्या सर्पास जीवदान देता आले याचा मनस्वी आनंद झाला असे सर्पमित्र श्री गणेश शिंगारे यांनी सांगितले..

