अमळनेर तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत जल साक्षरता विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
![]()
अमळनेर तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत जल साक्षरता विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , मंत्रालय महाराष्ट्र शासन राज्य पाणी व स्वच्छता मिशन ( SWSM ), मुंबई
जल जीवन मिशन मिशन स्तर 3 (टप्पा 3) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर मुख्य संसाधन संस्था अमळनेर( KRC) यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय पाणी पुरवठा योजनेशी निगडित जल साक्षरता विषयक दोन दिवसीय प्रशिक्षण तालुक्यातील 119 ग्रामपंचात मधील या कार्यक्रमात ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष (सरपंच) , ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे उपाध्यक्ष (उपसरपंच),पाणीपुरवठा कर्मचारी / जल सुलक्षक , मागासवर्गीय ( अजा/अज) ग्रामपंचायत सदस्य, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती( VWSC) महिला सदस्य किंवा नळ पाणीपुरठा योजनाचे देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतने निवड केली असलेली बचत गट प्रतिनिधी , यापैकी पाच प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येत आहे सदर प्रशिक्षण प्रसंगी विषय तंज्ञ साधन व्यक्ती यांच्याकडुन सदर प्रशिक्षण देण्यात येत आहे सदर प्रशिक्षण दरम्यान मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र , बॅग , पेन , पुस्तिका , नोटपॅड देखील प्रशिक्षणार्थी यांना वाटप करण्यात आले तसेच मार्गदर्शन देखील केले सदर प्रशिक्षण जिल्हा परिषद जळगांव मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अंकीत साहेब उपमुख्य कार्यकारी मा.श्री.सचिन पानझडे, क्षमता बांधणी तंज्ञ मनोहर सोनवणे , महेश सोनवणे गट विकास अधिकारी अमळनेर मा.श्री.एन आर पाटील , बीआरसी मोरे साहेब तसेच राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. भुपेन्द्र महाले यांच्या मार्गदर्शनाने सदर प्रशिक्षण सुरु आहे त्या प्रसंगी राष्ट्रविकास संस्थेचे प्रशिक्षक मुख्य प्रशिक्षक दिनेश पाटील , उमाकांत पाटील,तुषार पाटील तसेच सहाय्यक प्रशिक्षक राहुल सूर्यवंशी, रागिणी महाले,विद्या पाटील,ज्योती पाटील त्याच प्रकारे संस्थेचे नयना चौधरी, महेश माकडे ,सिमा महाजन,भाग्यश्री गोसावी, गोरख पाटील, दिलीप पाटील,हिलाल पाटील,चेतन पाटील,कुणाल पाटील,पंकज पाटील, चंद्रकांत बोरसे यांनी सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या करण्यासाठी नियोजन केले

