महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शक्ती प्रदर्शनातून जोरदार स्वागत
1 min read

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शक्ती प्रदर्शनातून जोरदार स्वागत

Loading

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शक्ती प्रदर्शनातून जोरदार स्वागत

अमळनेर प्रतिनिधी – महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल नथु शिंदे यांनी आज उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज सादर केला.
संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी डॉ. अनिल शिंदे यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्ती प्रदर्शन केले.

 

 

 

 

 

 

(महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे याच्याकडे
सादर करतांना सोबत शरदचंद्र पवार गटाचे डॉ बी एस पाटील,महिला राज्य प्रमुख तिलोत्तमा पाटील, उभाठा गटाच्या एडवोकेट ललिता पाटील)

 

उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत, उपस्थित कार्यकर्त्यांनी संत सखाराम महाराज वाडी, जैन मंदिर, सराफ बाजार, मांगिरबाबा दर्शन, पाचकंदिल मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हुतात्मा चौक, समशेरसिंग पारधी स्मारक, सुभाष बाबू स्मारक, साने गुरुजी स्मारक, स्वामी नारायण मंदिर, गौसे पाक दर्गा, बौद्ध विहार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बळीराजा, आणि तहसील कचेरी या ठिकाणी एकत्र येऊन समर्थन दर्शवले.
या महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या मिरवणुकीत माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या कार्यालयाकडून उमेदवारीची रँली जात असतांना. यावेळी हिरा उद्योग समूहाचे डॉ. रवींद्र चौधरी यांनी डॉ. शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

या उपक्रमात उपस्थित असलेले शिरीषदादा मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा एकच सूर होता: “चला परिवर्तनाचे साक्षीदार होऊया.” या घोषणांनी आजूबाजूचा परिसरात वातावरण बदलले…
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे यांच्या पाठीशी राहण्याचा संकल्प केला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे ठरवले. शेतकरी, कर्मचारी ,कामगार, युवक,महिला यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीने डॉ शिंदे यांच्या रूपाने उमेदवारी दिली आहे असे सांगितले..

या कार्यक्रमात सर्व महाविकास आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, छोटे मोठे उद्योगधंदे करणारे व्यक्ती, युवा, शेतकरी सर्वांची उपस्थिती दिसून आली.
डॉ. शिंदे यांच्या उमेदवारीसाठी या विशाल समर्थनामुळे आगामी निवडणुकांमध्ये सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *