आयएएस राजेश पाटील बनले आयर्न मॅन   1.9 km पोहणे, 21 km धावणे, 90 km सायकलिंग आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण
1 min read

आयएएस राजेश पाटील बनले आयर्न मॅन  1.9 km पोहणे, 21 km धावणे, 90 km सायकलिंग आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण

Loading

आयएएस राजेश पाटील बनले आयर्न मॅन

1.9 km पोहणे, 21 km धावणे, 90 km सायकलिंग आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण

जळगाव प्रतिनिधी – महाराष्ट्रातील तरुणांचे आदर्श स्थान असणारे ओरिसा राज्यात महानगरपालिका भुवनेश्वरचे आयुक्त तसेच सहकार विभागाचे सचिव एरंडोल तालुक्यातील ताडे येथील राजेश प्रभाकर पाटील यांनी नुकतीच गोवा येथे पार पडलेली आयर्न मॅन ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेले असून ते आता आयर्न मॅन ठरलेले आहेत.अत्यंत आव्हानात्मक आणि संघर्षमय असणाऱ्या या स्पर्धेला त्यांनी दिनांक 27 ऑक्टोबर रविवार रोजी गोवा येथे सहभाग नोंदविला .या स्पर्धेमध्ये त्यांनी एकूण 1.9 किलोमीटर पोहणे 21 किलोमीटर धावणे आणि तब्बल 90 किलोमीटर सायकलिंग असे एकूण तीन पाडाव दिलेल्या वेळात यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत.
आपल्या प्रशासकीय कामातून स्वतःच्या शारीरिक फिटनेससाठी वेळ देऊन तरुणांसाठी राजेश पाटील यांनी नवीन आदर्श प्रस्थापित केलेला आहे . आपल्या प्रचंड व्यापाच्या प्रशासकीय नोकरीतून त्यांनी व्यायाम तसेच फिटनेस साठी वेळ काढून आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे.प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये यापूर्वी आयपीएस कृष्णप्रकाश यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. राजेश पाटील हे तरुणांसाठी नेहमीच आदर्श राहिलेले आहेत.आपल्या संघर्षमय जीवनातून आयएएस पदापर्यंतचा प्रवास त्यांनी “ताई,मी कलेक्टर व्हयनू” या पुस्तकातून तरुणांसाठी लिहिलेला आहे. या पुस्तकामुळे लाखो तरुणांचे आयुष्य बदललेले आहे. ओरिसा केडर मिळाल्यानंतर मयूरभंज, कोरापुट यासारख्या आव्हानात्मक ठिकाणी त्यांनी कलेक्टर पदाची यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडलेली आहे. कोरापुट हा भारतातील पहिला शून्य शाळाबाह्य मुलांचा जिल्हा म्हणून नावारूपाला त्यांच्या कारकिर्दीत आला. कारकिर्दीच्या एकाच वर्षात पंतप्रधान पुरस्कार आणि राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आपला ओरिसा राज्यातील संपूर्ण कार्य प्रवास त्यांनी “मोर ओडिषा डायरी” या पुस्तकातून नवीन तरुणांसाठी लिहिलेला आहे .
अल्पावधीसाठी महाराष्ट्रात आल्यानंतर पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिका आयुक्त पदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली .त्यांच्याच काळात पिंपरी चिंचवडचे सौंदर्य खुलायला सुरुवात झाली.
आयर्नमॅन ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून नवीन पिढीच्या तरुणांसाठी राजेश पाटील यांनी एक आदर्श उभा केलेला आहे.”तरुणांनी मोबाईल तसेच इतर व्यसनांमध्ये न अडकता स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊन शरीर संपदा जपावी असा संदेश देतात. या यशाबद्दल सर्वत्र त्यांच्या अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *