अमळनेरच्या नंदकिशोर पाटीलने एनडीएच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश…
1 min read

अमळनेरच्या नंदकिशोर पाटीलने एनडीएच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश…

Loading

अमळनेरच्या नंदकिशोर पाटीलने एनडीएच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश…

अमळनेर प्रतिनिधी – खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी नंदकिशोर योगेश पाटील, गलवाडे येथील रहिवासी असून त्यांनी एनडीएच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत 245 गुण मिळवले आहेत. याच बरोबर, मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
नंदकिशोर हा इंडियाच्या एनडीएसाठी निवड होणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याने कोणतीही अतिरिक्त क्लास न लावता हे यश मिळवले, जे विद्यार्थ्यांमध्ये एक आदर्श स्थापित करते.
या अभिमानास्पद यशाबद्दल प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक उल्हास मोरे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वी. एस. पाटील खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ. संदेश गुजराती, व्हाईस चेअरमन नीराज अग्रवाल, संचालक मंडळाचे सदस्य डॉ. अनिल शिंदे, हरि भिका वाणी ,योगेश मुंदडे,प्रदीप अग्रवाल, आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच सर्व प्राध्यापकांनी नंदकिशोरचे अभिनंदन केले आहे.
नंदकिशोरा यशावर सर्वांनी समाधान व्यक्त केले असून, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा स्रोत ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *