2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही ,माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र , कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या विधानसभा निवडणूकीत माघारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
1 min read

2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही ,माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र , कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या विधानसभा निवडणूकीत माघारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

Loading

2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही …

माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र

कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या विधानसभा निवडणूकीत माघारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही दादांमध्ये निवडणुकीची चुरस राहील असे तालुक्यातील नागरिकांना वाटत होते
व साहेबराव दादांबद्दल लोकांमध्ये ही सहानुभूतीची लाट होती पण अखेर दादांनी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विधानसभा उमेदवारी निवडणूक लढवणार नाही अशा आशयाचे पत्र दिल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली..
मा.ना.श्री.शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री असतांना शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टी ठेवून रोजगार हमी योजनेअंतर्गत फळ उत्पादन निगडीत फळझाडे लागवड कार्यक्रम राबविण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला व आमच्या जीवनात हि योजना संजीवनी ठरली.
जळगाव जिल्ह्यात उदार जनता कोठे असेल तर, अमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. इथल्या बहुतांश जनतेला फक्त “विकास” व्हावा असचं वाटत. सन २००९ ते २०१४ या कालावधीसाठी “नको कोणता राजकीय पक्ष जनता जनार्दन हाच पक्ष” विकासासाठी मला अपक्ष निवडून दिले होते. तदनंतर २०१६ ते २०२१ या कालावधीसाठी “लोकनियुक्त” नगराध्यक्षपदी आघाडीतून निवडून दिले होते. एखाद्या व्यक्तीकडून एखादी “दिव्यशक्‍ती” कार्य कसे करवून घेते, याचा आम्हास भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराजांचा क्षणोक्षणी अनुभव येतो. आमचा अधिकार नसतांनाही आमच्या हातून जनहितार्थ अनुकरणीय कार्य कसे घडले हे महाराजच जाणतात.
आम्हाला कसलाही राजकीय वारसा नसतांना स्वकर्तृवावर उच्च स्थानी आम्ही दोघांनी आपल्या कार्यातून व्यक्‍तित्वाची
अमीट छाप सोडली आहे “जातीय समीकरणाची विकासावर कुरघोडी” होत असल्यामुळे सध्यस्थितीत जे काल होते……तेच चांगले होते. ते मी नाही,
वेळच सांगत आहे.
मी खरं बोलतो,कडक बोलतो रोखठोक बोलतो,दिशाभूल नाही, ‘काम हीच माझी ओळख’ असल्यामुळे मला मोठा जनादार असूनही पक्षातील स्थानिक नेते स्वत:ची नेतेगिरी चालवतात. नेतृत्व न मानणारे या कारणामुळेच आजपर्यंत पूर्ण शाश्‍वत विकास होवू शकला नाही,
हे कटू सत्य आहे. सबब येणारी विधानसभा निवडणूक – २०२४ न लढविण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. या आशयाचे पत्र माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार रोहित पवार यांच्याकडे सुपूर्द केले आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *