यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सातत्य ठेवा-सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील
![]()
यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सातत्य ठेवा-सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील
स्व.साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालयात गुणगौरव समारंभ व सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
खेडी प्र. ज. येथे स्व. साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालयात गुणगौरव समारंभ व सेवापुर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम प्रा. श्याम साहेबराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होता..कार्यक्रमात गावातील नागरिक श्री गंभीरराव आनंदा शिंदे यांचा पोलीस खात्यातून पीएसआय पदावरून नुकत्याच सेवानिवृत्त झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय, खेडी सिम प्र. ज. च्या नवनियुक्त पोलीस पाटील सौ. हर्षदा कैलास पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात 15 ऑगस्ट निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांचे परिणाम घोषित करण्यात आले, ज्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. 2024 मध्ये 10 वी व 12 वी यशस्वीरित्या पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुलाबरावजी पाटील, सेवानिवृत्त न्यायाधीश (अमळनेर), व वासुदेव देसले (डी. वाय. एस. पी. नाशिक ग्रामीण) उपस्थित होते. सौ. सुषमा देसले (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर) यांनी देखील कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाऊराव बारकुजी पवार यांनी भूषविले, आणि यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री बळवंत माधवराव पवार व सौ. इंदुबाई भाऊराव पवार हे देखील उपस्थित होते.
गंभीरराव शिंदे यांनी वाचनालयाच्या तर्फे दिलेल्या सत्काराबद्दल आभार मानले आणि पुढील काळात समाज उपयोगी कामांमध्ये सहभागी होण्याचे वचन दिले.
गुलाबरावजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सातत्य आणि चिकाटीचा महत्त्व सांगितला, यश मिळवण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. डिवाएसपी वासुदेव देसले यांनी वाचनालयामार्फत राबवलेल्या कार्यक्रमांच्या प्रशंसेसह विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन केले.
भाऊराव पवार सर यांनी वाचनालयाचे कौतुक करत गडद आवाजात सांगितले की, असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात प्रेरणा मिळेल.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. श्याम पवार सर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. कैलास पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जिजाबराव पाटील यांनी केले.
या समारंभाला गावातील ज्येष्ठ, श्रेष्ठ व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
या कार्यक्रमाला सहकार्य म्हणून अमळगाव वि.का.सो. चेअरमन राजेंद्र पवार व राजमुद्रा अभ्यासिकेतील सर्व सदस्यांनी योगदान दिले.

