सार्वजनिक विद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन
1 min read

सार्वजनिक विद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Loading

सार्वजनिक विद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन

असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आज भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे, मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल,ज्येष्ठ शिक्षक डी.जी. महाजन यांच्या हस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवस यानिमित्ताने याप्रसंगी हितेश सोनवणे व रईस पिंजारी या विद्यार्थ्यांकडून अभिवाचन करून घेण्यात आले. सृष्टी डोळसे या विद्यार्थिनीने अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मंगला नारखेडे यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील घडामोडी, त्यांचे कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना चला एक तरी पुस्तक खरेदी करून संग्रही करूया व वाचूया असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना चौधरी तर आभार संतोष कचरे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *