पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात भारताचे मिसाईल मॅन ,माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले व वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला..
यावेळी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले.. ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी डॉक्टर कलाम यांच्या फोटोचे माल्यार्पण केले…
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केली जाते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना शिक्षण आणि वाचनाची प्रचंड आवड होती. या विशेष दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचनाशी संबंधित विविध उपक्रम आयोजित करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित केले जाते. साने गुरुजी वाचनालयात ही वाचकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली..
यावेळी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, संयुक्त चिटणीस सुमित धाडकर, ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव, दिपक वाल्हे, वाचक माजी नगरसेवक परशुराम महाले, सोमा रावजी ठाकूर,गोपाल पाटील कासार, गुरव ई. वाचक उपस्थित होते..

