समाजसेवेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार गो.पी.लांडगे यांना जीवन गौरव पुरस्कार
1 min read

समाजसेवेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार गो.पी.लांडगे यांना जीवन गौरव पुरस्कार

Loading

समाजसेवेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार
गो.पी.लांडगे यांना जीवन गौरव पुरस्कार

 

धुळे- धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष पत्रमहर्षी श्री गो.पी. लांडगे यांना समाजसेवा तसेच पत्रकारीतेतील प्रदिर्घ योगदानाबद्दल रंगकर्मी साहित्य,कला क्रिडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूरतर्फे मानाचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. मानाचा समजला जाणारा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे उत्तर महाराष्ट्राच्या पत्रसृष्टीतून तसेच विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
लातून जिल्ह्यातील उदगीर येथे रंगकर्मी साहित्य,कला क्रिडा प्रतिष्ठानतर्फे पहिले राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलन होत आहे. त्याअनुषंगाने या प्रतिष्ठानच्यावतीने समाजसेवेतील योगदानाबद्दल महाराष्ट्रस्तरीय जीवनगौरव पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे साप्ता.एकला चालो रे चे संपादक श्री गो.पी. लांडगे यांना जीवन गौरव पुरस्कार घोषीत झाला आहे. श्री गो.पी.लांडगे यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच पत्रकारीतेला प्रारंभ केला. राज्यातील विविध नामांकित दैनिकात त्यांनी प्रतिनिधी, म्हणून अभ्यासपूर्ण पत्रकारीता केली आहे. तसेच शासनाच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीवरीही त्यांनी काम पाहिले आहे. अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गोपी लांडगे यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सरचिटणीस, विभागीय उपाध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. समाजसेवक आणि श्रममहर्षी बाबा आमटे, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात त्यांनी सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविला आहे. तसेच राष्ट्रीय बंधूता समाज,पुणेचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी, मंत्री ना.छगनराव भुजबळ, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस अशा राज्यातील मान्यवरांच्या हस्ते सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रातील विविध पुरस्कार देवून श्री गो.पी.लांडगे यांचा सन्मान झाला आहे. त्यांचे प्रदिर्घ सामाजिक कार्य लक्षात घेता रंगकर्मी साहित्य,कला क्रिडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूरतर्फे जीवन गौरव पुरस्कार घोषीत झाला आहे. त्यांचा उदगीर जि.लातूर येथे दि.20 ऑक्टोबर 2024 रोजी होणार्‍या पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनप्रंसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ.रविंद्र चिंचोलकर, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, राज्याचे युवक कल्याण व बंदरे मंत्री ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती रंगकर्मी साहित्य,कला क्रिडा प्रतिष्ठान उदगीर संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. बिभीषन मद्देवाड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *