श्री संत सद्गुरू गजानन महाराज देवस्थान भुसावळ येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन
1 min read

श्री संत सद्गुरू गजानन महाराज देवस्थान भुसावळ येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन

Loading

श्री संत सद्गुरू गजानन महाराज देवस्थान भुसावळ येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन

 

 

भुसावळ येथील रामकृष्ण नगर, म्हाडा कॉलनी व दत्त नगर परिसरातील श्री गजानन महाराज मंदीराचे अध्यक्ष श्री मधुकर ढाके व ट्रस्टी मंडळांतर्फे नवरात्रीचे नऊ दिवस रोज संध्याकाळी काॅलनीतील शाळेकरी मुले व महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पाककला, उखाणे, फॅन्सी ड्रेस, सोलो डान्स, गृप डान्स अशा विविध मनोरंजनात्मक व स्किल डेव्हलपमेंट च्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात अमळनेर येथील रहिवासी श्री समर्थ क्लासेस च्या संचालिका व सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. ज्योत्स्ना प्रमोद महाजन यांनी पाककला स्पर्धत पौष्टिक तृणधान्यापासून नागली व ज्वारी यापासून अनुक्रमे गुलाबजाम व खान्देशी पिझ्झा ची पाककला कृति सादर करून तृतीय क्रमांक तर त्यांची मुलगी कु. सानिका प्रमोद महाजन, कु. हिताक्षी महाजन, व सौ. मृदुला बोडस ह्या गृपडान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विजयी झाल्या,

 

विजयी झालेल्या स्पर्धकांना नगरसेवक श्री महेंद्रसिंग (पिंटू भाऊ) ठाकूर यांचे शुभहस्ते हस्ते श्री गजानन महाराज प्रतिमा, ट्राॅफी, स्मार्ट वाॅच, प्रशस्तीपत्र देऊन तर शाळेकरी मुलांना लेखन साहित्य, प्रशस्तीपत्र व ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. पुर्वीच्या काळी बाजरी, ज्वारी, नागली, राजगिरा, भगर, कोदो या पौष्टिक तृणधान्याचा आपल्या आहारात नियमीत समावेश केला जात होता परंतू हरीत क्रांतीनंतर बाहेरील देशांमधून गहू, तांदूळ, मका यांचे आयात केल्यामुळे त्यापासून बनविलेल्या फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, चॅनीज फूड यांचे आहारात नित्य सेवनामुळे पचन संस्थेचे विविध आजार, दमा, अॅटक, डायबेटिस, हात पाय दुखणे, अकाली वृध्दापन, केस गळणे, थकवा असे आजार निर्माण झाले आहेत तरी पौष्टिक तृणधान्याचे नियमीत आपल्या आहारात समावेश करण्यासाठी व त्यांचे महत्व पटवून देण्यासाठी सौ. ज्योत्स्ना महाजन यांनी ज्वारी व नागली पासून बनविलेल्या पदार्थाची रेसिपी इतर महिलांना शिकवावे असे उपस्थित पर्यवेक्षक, अतिथी मान्यवर व स्पर्धचे अध्यक्ष सौ. अनुराधा बावस्कर यांचे तर्फे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *