विजया दशमी निमित्ताने अमळनेरात संघाचे सघोष पथसंचलन संपन्न
1 min read

विजया दशमी निमित्ताने अमळनेरात संघाचे सघोष पथसंचलन संपन्न

Loading

विजया दशमी निमित्ताने अमळनेरात संघाचे सघोष पथसंचलन सम्पन्न

अमळनेर दि.12 ऑक्टोबर

येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने विजया दशमी निमित्ताने सघोष
पथसंचलन निघाले त्यावेळी स्वयंसेवक उपस्थित होते. सुरुवातीला सर्वच स्वयंसेवक सखाराम महाराज यांच्या मंदिराजवळ संघ गणवेशात एकत्र आले.त्यानंतर शाखा लागली. स्वयंसेवक गणशा एक ते पाच गणात उभे होते. गण एक व दोन त्यानंतर ध्वज, घोषनंतर गण तीन, चार व पाच या क्रमाने
स्वयंसेवक उभे होते. सखाराम महाराज यांच्या मंदिरातून सुरुवात झालेले पथ संचलनात पारोळा पुलावरून पैलाड मधून फर्शी फूल मार्गे डॉ.आंबेडकर पुतळा, सुभाष चौक, गूळ बाजार येथून दगडी दरवाजा मार्गे संचलन स्थळी आले. संचलन मार्गात व पैलाडमधील नागरिकांनी संचलन मार्गावरून रांगोळी काढलेली दिसली तर ठीक ठिकाणी संचलनावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. घोषच्या तालबद्ध वादनाने रस्त्यातील दुतर्फा असलेल्या नागरिकांचे लक्ष वेधले.
तर नागरिक संचलनाचे मोबाईल द्वारे चित्रण करताना दिसले.
संचलनात जुने व नवे स्वयंसेवक उत्साहाने उपस्थित होते.शेवटी संघ प्रार्थना झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *