खान्देशातील पारोळा येथील ऐतिहासिक नगरीत कुलदैवत श्री बालाजी महाराज व माता वैष्णोदेवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसाद व माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आज संपन्न
![]()
माळी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व महाप्रसाद सोहळा संपन्न
———————————————-
पारोळा : खान्देशातील पारोळा येथील ऐतिहासिक नगरीत कुलदैवत श्री बालाजी महाराज व माता वैष्णोदेवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसाद व माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आज संपन्न झाला.या सोहळ्यात इ.दहावी,बारावी, पदवीधर,मेडिकल व इंजीनियरिंग या विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळालेल्या माळी समाजातील 25 विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला.तसेच माळी समाजातील पंधरा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यात संतोष महाजन, पी एस माळी, संजय माळी, वना महाजन, प्रकाश महाजन, गुलाब महाजन, बापू महाजन, धीरज महाजन, आकाश महाजन इ. प्रस्तुत गुणगौरव सोहळ्याचे प्रमुख अध्यक्ष तामसवाडी गटाचे जि.प. सदस्य रोहन सतीश पाटील व सौ.वर्षा रोहन पाटील हे होते. या कार्यक्रमाचे आयोजक समाज व शिक्षण प्रेमी प्रा.डॉ.रविंद्र माळी (किसान महाविद्यालय, पारोळा) व आशा रविंद्र माळी हे दांपत्य होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.विजय तुंटे (उपप्राचार्य प्रताप महाविद्यालय, अमळनेर व अध्यक्ष, क.ब.चौ.उमवि, जळगांव राज्यशास्त्र अभ्यास मंडळ),डॉ. गुणवंत सोनवणे (उपप्राचार्य किसान महाविद्यालय, पारोळा तसेच क.ब. चौ. उमवि, जळगांव,रसायनशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष), प्रा.डॉ.ज्ञानेश्वर कांबळे, (मराठी साहित्याचे अभ्यासक, प्रताप महाविद्यालय,अमळनेर) समता परिषदेचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष महाजन, नानासो डॉ.शांताराम दाजीबा पाटील,चेअरमन पीपल्स एज्युकेशन सोसायटी मोंढाळे ता.पारोळा, माळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष कैलास भाऊलाल महाजन व रमेश माळी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.सदस्य रोहन पाटील म्हणाले की, प्राध्यापक रवींद्र माळी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ज्योतिबा फुले,शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य समाजाला नेहमीच प्रेरणा देणारी आहेत. कै.भास्कर राजाराम पाटील यांनी यांनी सुद्धा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज व आंबेडकर यांचे विचार आदर्श मानून त्याप्रमाणे समाजसेवेचे व शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य केले. आजच्या विद्यार्थ्यांनी नीतिमूल्य बाळगून समाजाच्या व देशाच्या सेवेसाठी सेवेसाठी नेहमी तत्पर असावे. याप्रसंगी डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी कसे यशोशिखर गाठावे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी डॉ. विजय तुंटे याप्रसंगी म्हणाले की, ज्योतिबा फुले,शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता आज सुद्धा महत्वाचे आहे. या तीन महामानवाच्या विचारामुळे भारत एक जगाची प्रबळ अर्थशक्ती बनू शकते. विद्यार्थ्यांनी या तीन महामानवाचे विचार अंगीकृत करून स्वतःला कर्तृत्ववान बनवावे.
प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ.गुणवंत सोनवणे म्हणाले की, विद्यार्थ्यांना सत्कार व गुणगौरव केल्यामुळे निश्चितच प्रेरणा मिळते तसेच त्या यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी त्यांच्यात निर्माण होते .कार्यक्रमाबद्दल अभिप्राय देताना संतोष महाजन म्हणाले की, हा सोहळा म्हणेज नवरात्र उत्सव, विद्यार्थी गुणगौरव व व महाप्रसादाचे स्नेह भोजन असा त्रिवेणी संगम साधणारा मंगलमय सोहळा आहे. प्राध्यापक रवींद्र माळी व सौ.आशा माळी यांचे हे समाजासाठी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असून त्यांच्या हातून नेहमी अशी समाजसेवेचे कार्य होत राहो, म्हणून सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी वर्षाताई पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिले आणि माळी समाजासाठी विकासाभिमुख कार्य करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ.आशा माळी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ.रवींद्र माळी यांनी केले. प्रस्तुत गुणगौरव व महाप्रसादाचा भंडारा हा कार्यक्रम निश्चितच समाजासाठी उपयुक्त व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी देणारा आहे,असा संदेश माजी आमदार व राज्यमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी दिला आहे.

