करिअरसाठी ग्रामीण उद्योजकता व नव्या संधी महत्त्वाचे- अभियंता विनायक पाटील यांचे प्रतिपादन
1 min read

करिअरसाठी ग्रामीण उद्योजकता व नव्या संधी महत्त्वाचे- अभियंता विनायक पाटील यांचे प्रतिपादन

Loading

करिअरसाठी ग्रामीण उद्योजकता व नव्या संधी महत्त्वाचे- अभियंता विनायक पाटील यांचे प्रतिपादन
———————————————–
अमळनेर: प्रताप कॉलेज, अमळनेर येथील Incubation and Innovation Centre च्या वतीने ८ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता Entrepreneurship development and possibility in rural areas या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रायोजक राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) होते. प्रमुख अतिथी अभियंता विनायक पाटील (स्टार्टअप इंडिया मेंटर, NISBUD, नोएडा मास्टर ट्रेनर) यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तुत व्याख्यानाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा.डॉ.विजय तुंटे यांनी भूषवले, तर कार्यक्रमाचे समन्वयक
प्रा.निलेश पवार होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन पाटील यांनी केले.
“ग्रामीण भागातील उद्योजकतेचा विकास आणि संधी” या विषयावर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी नोकरी आणि उद्योजकता यातील फरक, तसेच उद्योजकतेच्या फायद्यांवर भर दिला. त्यांनी यशस्वी उद्योजकात आवश्यक नेतृत्व, निर्णयक्षमता, आणि नवीन कल्पनांची निर्मिती यांसारख्या गुणधर्मांवर चर्चा केली. त्यांनी विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि साधनांची माहिती दिली, जी उद्योजकांना मदत करू शकतात.
उद्योजकतेची चार टप्प्यांची प्रक्रिया त्यांनी स्पष्ट केली – संशोधन, व्यवसाय योजना, संसाधन व्यवस्थापन, आणि अंमलबजावणी.विनायक पाटील यांनी ग्रामीण भागातील कृषी, अन्न प्रक्रिया, हस्तकला यासारख्या क्षेत्रांतील संधींचे महत्त्व सांगितले. उद्योजकतेतील अडचणी आणि उपाय, तसेच सरकारी योजनांचे लाभ जसे की मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया यांचे महत्त्व त्यांनी उलगडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IQAC समन्वयक प्रा.मुकेश भोळे, प्राचार्य डॉ.अरुण जैन तसेच महाविद्यालय व्यवस्थापन यांचे विशेष योगदान होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता प्रा.रोहन गायकवाड यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेत प्रा.डॉ.रवी बाळसकर, प्रा.डॉ.माधव भुसनर,
प्रा.किरण सूर्यवंशी, प्रा.जयेश साळवे, आणि श्री.दिपक चौधरी यांचा मोलाचा वाटा होता. यावेळी व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी विषयासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विनायक पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *