झांबरे विद्यालयात अपर आयडी संदर्भात नववी दहावीच्या पालकांची सभा
1 min read

झांबरे विद्यालयात अपर आयडी संदर्भात नववी दहावीच्या पालकांची सभा

Loading

झांबरे विद्यालयात अपर आयडी संदर्भात नववी दहावीच्या पालकांची सभा

के.सी.ई.सोसायटी संचालित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात यु-डायस प्रणाली अंतर्गत आलेल्या अपार आय.डी.संदर्भात इयत्ता नववी दहावीच्या पालकांची सभा नुकतीच घेण्यात आली. शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री महेंद्र नेमाडे यांनी अपार आयडी मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक इतिहासाच्या नोंदी कशा ठेवल्या जातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रवेश प्रक्रिया तसेच शैक्षणिक योजनांमध्ये स्कॉलरशिप निधी वाटप आणि नोकरी तसेच करिअरसाठी उपयोग होईल या अपार आय. डी. मध्ये असणारी सर्व माहिती यूआयडीएआय तसेच यु-डायस प्लस आणि डिजिलॉकरवर संग्रहित आणि जतन केले जाईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन पीपीटी आणि व्हिडिओच्या माध्यमातून केले.
अपार आय.डी. हा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा क्रमांक असणार आहे ज्याद्वारे विद्यार्थी स्वतःची शैक्षणिक प्रगती कशी होत आहे आणि त्यात कशा पद्धतीने वाढ करता येईल याबाबत माहिती बघू शकतो असे शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी पालकांना स्पष्ट केले. सभेचे सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र पालवे यांनी मानले
या कार्यक्रमाचे संयोजन प्रतिभा लोहार, वर्षा चौधरी, पूनम कोल्हे निर्मल चतुर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *