सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन
![]()
सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन
असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे माजी पंतप्रधान जय जवान जय किसान हा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल होते.कोमल नारखेडे, मोहिनी पाटील,हेतल कोल्हे,सृष्टी डोळसे,हर्षाली पाटील,श्लोक गवळी,चेतन आढळकर सिद्धार्थ कापडणे व भावेश पाटील या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील काही क्षण, त्यांचे कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक एल जे पाटील,उपशिक्षिका चारुलता टोके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन भावना चौधरी तर आभार एस.डी. कचरे यांनी मानले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

